मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना संपूर्ण महिती
thibak sinchan yojana Maharashtra
संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
ही पण बातमी वाचा जिल्हापरिषद योजन
सदर योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

thibak sinchan yojana Maharashtra
१, संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून आता या शासन निर्णयान्वये राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांचा सदर योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ही पण बातमी वाचा सोयाबीन बियाणे मोफत नोंदणी सुरु | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ | Soyabin Biyane 2022
कोणाला मिळणार लाभ
२. सदर १०७ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची अंमलबजावणी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी, सदर तालुक्यांची यादी याशासन निर्णयासोबत सहपत्रित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. सं. क्र. ३०९/२१/व्यय-१, दि.१२ नोव्हेंबर, २०२१ अन्वये प्राप्त मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.