(Pockra) नानाजी देशमुख योजना सुरू// अर्ज भरणे सुरू

महाराष्ट्र शासन – कृषी विभाग
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक
आत्मा कार्यालय बुलडाणा विभाग
POCRA
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
पाश्वर्भूमीः
महाराष्ट्र राज्यातील पन्नास टक्क्याहून अधिक लोकसंख्या ही कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीचा संपूर्ण
विकास हा सर्वस्वी अनियमित पावसावर अवलंबून असून त्यात मोठे चढ उतार दिसून येतात. हवामानातील या
प्रतिकूल बदलांचा आघात पेलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषि
संजीवनी प्रकल्प राज्यातील १५ जिल्हयामधील निवडक गावांमध्ये राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या
प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ४४१ गावांचा समावेश झालेला असून त्यामध्ये आपल्या गावाचा समावेश
झालेला आहे.
प्रकल्पाचा उद्देशः
महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून
घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशिर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी:
निवड झालेल्या गावांमध्ये सहभागीय सूक्ष्मनियोजन करून गावाचा विकास आराखडा ग्रामसभेच्या मदतीने
केला जातो. गावामध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम कृषि संजीवनी समितीच्या
माध्यमातून केली जात असून ही ग्रामपंचायतीची उपसमिती आहे.
प्रकल्पातील घटकः
प्रकल्पात खालीलप्रमाणे चार मुख्य घटक असून त्यांचे अंतर्गत वैयक्तिक लाभाचे घटक, मृद व जलसंधारणाचे
उपचार, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांना बळकटीकरणासाठी अनुदान उपलब्ध आहे. याबाबत
सविस्तर माहिती सोबतच्या प्रपत्रात नमूद केलेली आहे.
१) हवामान अनुकूल कृषि पद्धतीस प्रोत्साहन देणे,
२) पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर.
३) काढणी पश्चात हवामान अनुकूल व्यवस्थापन व मूल्य साखळीस प्रोत्साहन देणे.
४) क्षमता बांधणी आणि संस्थात्मक विकास.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

वैयक्तिक लाभाचे घटकांची अंमलबजावणी
प्रकल्पात समाविष्ट वैयक्तिक लाभाचे घटकांचा लाभ घेण्यासाठी डीबीटी प्रणाली विकसित केलेली असून संपूर्ण
प्रक्रिया ऑनलाइन आहे. अर्जदारांनी https://dbt.mahapocra.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावयाचे
असून खाली नमूद केल्याप्रमाणे अर्जावर प्रक्रिया होऊन अनुदान अदायगी केली जाते.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पर्मनंट भरती | NIT Recruitment 2022 | NIT Calicut Job Vacancy

डेस्क-१
डेस्क-२ पूर्व संमती-शेतकऱ्याच्या विहित
नमुन्यातील अर्ज-
जमिनीचा ७/१२,८-अ,
सामाजिक प्रवर्ग/दिव्यांग यांचे प्रमाणपत्र ग्राम कृषि संजीवनी समितीची (VCRMC) मान्यता तांत्रिक पडताळणी-कृषी सहाय्यक। समुह सहाय्यक। कृषी पर्यवेक्षक उपविभागीय कृषि अधिकारी / तालुका अर्जदारामार्फत मंजूर घटकाची
अंमलबजावणी करून कृषी सहाय्यक आणि समुह सहाय्यक यांना अवगत करणे कृषी अधिकारी डेस्क-४
DBT व्दारे लाभाथ्यांच्या आधार”लिंक बँक खात्यात थेट
अनुदान मंजूरी
उपविभागीयकृषि अधिकारी अनुदानाची
परिगणना-लेखाधिकारी (उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय मोका तपासणी
कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृ.अ./ तालुका कृ.अ.उपविभागीय
कृषी अधिकारी
अनुदान अदायगी
अधिक माहितीसाठी आपले गावातील समूह सहायक/कृषि सहायक/तालुका कृषि अधिकारी/उपविभागीय
कृषि अधिकारी कार्यालय/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे संपर्क करावा.
प्रकल्पाचे बाबतीत सविस्तर माहिती https://mahapocra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध
आहे.
जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय
भवटे हॉस्पिटल समोर, धाड रोड, बुलडाणा. पिन कोड ४४३ ००१
ई-मेल: [email protected]
दूरध्वनी क्रमांक: ०७२६२ २४२३८९
AARE
बदलत्या हवामानाला एकच विकल्प
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

या फोटो वरती हे लाभ मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IMG 20200907 WA0051

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *