Krushi yantrikran / कृषि यांत्रिकीकरण 152 कोटी अनुदान बँक खात्यावर जमा होणार

राज्यात केंद्र पुरस्कृत Krushi yantrikran उपअभियान राबविण्यात येत आहे. सदर उप अभियानांतर्गत एकूण आठ घटक असून घटक क्र. १ व २ हे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या संयंत्रांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षण चाचणीबाबत आहेत. घटक क्र.१ व २ यासाठी केंद्र हिश्श्याचे प्रमाण १०० टक्के आहे. उर्वरित ६ घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधी हिश्श्याचे प्रमाण ६०:४० असे आहे.

केंद्र शासनाने संदर्भ १ अन्वये कृषि यांत्रिकीकरण अभियानासाठी सन २०२१-२२ करिता केंद्र हिरसा रु. ९१४८..१६, लक्ष व समरुप राज्य हिस्सा रु. ६०९८.७७ लक्ष अशा एकूण रु. १५२४६.९३ लक्ष निधीच्या कार्यक्रमास मान्यता देऊन केंद्र हिश्श्याचा रू. ९५४८.१६, लक्ष निधी वितरित केला आहे. सदर योजनेकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कार्यक्रमाच्या निधीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. ५०५८०.२७ लक्ष, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रु. ३००० लक्ष व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रु. १६६६.६७ लक्ष निधीचा समावेश आहे.

वित्त विभागाच्या संदर्भाकीत दि.१४.१०.२०२१ च्या परिपत्रकान्वये कार्यक्रम खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ५० टक्के निधी वितरणाचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान केले आहेत त्यामुळे सद्य:स्थितीत, सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध तरतूदीच्या ५०% निधी विभागाच्या पातळीवरुन वितरीत करणे शक्य आहे. आणि उर्वरित निधी सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने यथावकाश वितरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार या उप-अभियानाकरिता सर्वसाधारण प्रवर्गाच्या उपलब्ध तरतूदीच्या ५० टक्के म्हणजे रु. ५० कोटी निधी केंद्र हिस्ता रु. ३० कोटी व राज्य हिस्सा रु. २० कोटी) कृषि आयुक्तालयास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

शासन निर्णय:
१. सन २०२१-२२ मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीकरिता रु. १५२४६.९३ लक्ष (रूपये एकशे बावन्न कोटी शेहेचाळीस लाख व्याण्णव हजार फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, त्याचे घटकनिहाय विवरण घटक क्र.३ शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरण
औजारे आणि साहित्य यासाठी अनुदान घटक क्र. ४ कृषि यंत्र/औजारे बँक स्थापन करण्यासाठी अनुदान घटक क्र. ५ उच्चतंत्रज्ञान व उत्पादनक्षम आधारित साहित्याचे हबची निर्मिती घटक क्र.६ निवडलेल्या गावांमध्ये कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्सा
६. इतर यंत्र/अवजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचना,
अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,
७. सदर निधी खर्च करतान तो विहित कार्यपध्दती अनुसरून सर्व वित्तीय कायदे/प्रक्रियाचे/वित्तीय
अधिकारांच्या मर्यादे/c.v.C. तत्वानुसार/ प्रचलित शासन निर्णय/ नियम/ परिपत्रक/तरतुदीनुसार, बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणांनी करावी. कोणत्याही परिस्थितीत कुठलाही शासन नियम/ अधिकाराचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचीजबाबदारी संबंधित क्षेत्रिय कर्यालयाची राहील.

ही व बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा


८. Krushi yantrikran उप अभियानाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषि
आयुक्तालय यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन उदिष्टनिहाय अंमलबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्गमित कराव्यात.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
९. सदर अभियानाकरिता वितरित केलेला निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि), कृषि
आयुक्तालय, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून आणि राहाय्यक संचालक (लेखा-१) कृषी आयुक्तालय,
पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे:-
१०.हा शासन निर्णय वित्त विभागाने शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२१/प्र.क्र.४८/अर्थ-३, दि.१४/१०/२०२१ नुसार विहीत केलेल्या अटींची पुर्तता होत असल्याने तसेच, सरद परिपत्रकानुसार या विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेतांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *