Buldhana Nuksan Bharape / शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट जमा

जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर Buldhana Nuksan Bharape झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. खरीप हंगाम सन 2021 मध्ये माहे जुन ते ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 2.17 लक्ष हेक्टर क्षेत्र बाधित झाले. निकषानुसार 96 हजार 457 शेतकऱ्यांच्या 74.87 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 1 लक्ष 25 हजार 21 शेतकऱ्यांना 99.91 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 69 हजार 596 लाभार्थी शेतकऱ्यांना 1139 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे.

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रूपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 23 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून 2021 वर्षात 9 लक्ष 36 हजार थाळी सवलतीच्या दरात वितरीत करण्यात आली आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार 400 क्विंटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे.  जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये आतापर्यंत 53 हजार 327 व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 831 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 275 मजूरांची उपस्थिती आहे.  

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, पुढील 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 257 कोटी वित्तीय मर्यादेपेक्षा 57 कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला 315 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून गाव तेथे वाचनालय, रस्ते निर्मिती व आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून आजपर्यंत 18 हजार 117 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे Buldhana Nuksan Bharape

  भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षात 25 जप्ती कारवायांमध्ये एकूण 49 लक्ष 37 हजार 200 रूपये किमतीच्या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 622 योजना जल जिवन मिशन अंतर्गत असून 158 योजना प्रगती पथावर आहे. कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रि सुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रि सुत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

  कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी परेड रिपोर्टींग केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. साहेबराव सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                  ********

कर्जमुक्ती योजनेतंर्गत मयत कर्जदारांची माहिती बँकांनी अद्ययावत करावी. आरोग्य भरती

  Buldhana Nuksan Bharape,(जिमाका) दि. 26 : राज्यात 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुल शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) वर अपलोड करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत योजनेच्या सेंट्रल टीम मार्फत बँकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन सदर सुविधेची कार्यपद्धती बँकांना ई-मेलद्वारे सेंट्रल टीमवरुन पाठविण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *