Srskt nuksan bhrpae / शेतकऱ्यांना मिळणारा सरसकट नुकसान भरपाई

परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव त्रस्त झाला होता. आता शेतात खूप कष्ट करुन घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून गंजीसुध्दा खराब झाली आहे. कापसाची बोंड खराब झाले असून तूरीचे सुध्दा नुकसान झाले आहे. सुरवातीला बियाणे खराब निघाले नंतर किडीचा प्रादुर्भाव व आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
शेतपिकांच्या Srskt nuksan bhrpae भरपाईसह ज्या शेतीचा पावसामुळे पोत जाऊन नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सुध्दा मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे मांडले:

Srskt nuksan bhrpae
असं नाही की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकसान किती होत आहे, पाऊस किती पडतोय ह्याचा अंदाज आणि माहिती आम्ही सगळेच जण घेत आहोत.

आम्ही उद्या व परवा पण इथे येणार आहोत. शेतकरी व सर्व आपत्तीग्रस्त, ज्यांचे घरदार, संसार वाहून गेले आहेत, ते वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत. त्यांना आम्ही सांगितले आहे की, आपण काळजी व चिंता करू नका, जे जे करता येणे शक्य आणि आवश्यक आहे, ते सगळे आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही.

येते काही दिवस अतिवृष्टीचा, धोक्याचा इशारा दिला गेला आहे. संकट पूर्ण टळले आहे, असे नाही. पंचनामे सुरू आहेत. पूर्ण परिस्थितीचा आढावा लवकरच घेतला जाईल आणि तो घेतल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे, ते हे सरकार करणार आहे.

दुर्दैवाने आपले काही बांधव, माता-भगिनी मृत्युमुखी पडल्या, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची आवश्यकता असते, तो द्यायला आम्ही सुरुवात केली आहे. कोणीही काळजी करण्याचे व घाबरण्याचे कारण नाही फक्त अजून काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे, सावध रहा, प्राणहानी होता कामा नये.

घरबसल्या नोकरी

पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राकडून मदत मागण्यात चूक काहीच नाही. उलट शुक्रवारी माननीय पंतप्रधान मोदी जी यांचा मला फोन आला होता. गरज पडल्यास लागेल ती मदत करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

अशावेळी पक्षीय राजकारण न करता सर्वांनी एक होऊन केंद्राकडे मदत मागावी. इथे राजकारण करू नये, मला ते करायचं नाही. शेतकऱ्यांना साह्य करणे, हा माझा प्राधान्यक्रम आहे.

पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षांच्या शेतकरी दादांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असा पाऊस पाहिलेला नाही.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या’

उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.

जनतेला मी आवाहन करतो की गाफील राहू नका, पावसाचा इशारा आहे. काळजी घ्या, सुरक्षित ठिकाणी रहा. सरकार तुमच्यासोबत आहेच पण, स्वत:ला जपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *