दोन लाख वाढीव शेतकरी ठरले पात्र / pik vim shetkari

दोन लाख वाढीव शेतकरी ठरले पात्र..pik vim shetkari शेतकरी राजाला त्याचाहिरावला जात असलेला हक्क मिळावा यासाठी आपण उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतरही चालढकल सुरू होती. उपोषणापूर्वी कंपनीने १४ ऑक्टोबर रोजी १,५८,५३४ शेतकरी भरपाईस पात्र असल्याची यादी दिली. आपण ती मान्य न केल्याने पुन्हा बदलून १,७९,७३८ शेतकरी पात्र असल्याचे कळवण्यात आले.

dhan utpadak shetkari / शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

त्यांची नियत साफ नसल्याचे लक्षात आल्याने आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केले तेव्हा ३,५३,४९९ शेतकऱ्यांची यादी देण्यात आली. आता १,९४,९६५ शेतकरी वाढले. हे आपल्या एकजुटीचे पहिले यश आहे. आपण आज जिल्हाधिकारी महोदयाना विमा कंपनीकडून उर्वरित रकमेबाबत चर्चा केली व ते देत नसतील तर त्यांची प्रॉपर्टी जप्त करून वसुली व्हावी आणि शेतकऱ्यांची हक्काची देणी द्यावीत, अशी मागणी केली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी पत्रव्यवहार केल्याचे आज लेखी कळविले आहे. ही कार्यवाही तत्परतेने करावी व आपल्या बळीराजाला न्याय मिळावा, यासाठी आपला लढा सुरूच राहील. थांबायचं नाय गड्या आता थांबायचं नाय…pik vim shetkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *