dhan utpadak shetkari / शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

dhan utpadak shetkari योजनेच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

dhan utpadak shetkari बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना अजितदादांनी ही घोषणा केली.

ही पण बातमी वाचा पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात

अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि तेपण बोनसचा फायदा घेतात, याकडेही अजितदादांनी लक्ष वेधले. बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती, असेही अजितदादांनी सभागृहात सांगितले.

ही पण बातमी वाचा पर्मनंट नोकरी जॉब असा करा अर्ज

या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी फार मोठी आहे. याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

ही पण बातमी वाचा घरकूल यादी 2021

वरील लिंक वर क्लीक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *