शेळी पालन साठी अर्ज करा / Sheli Palan Anudan Yojana

धाराशिव जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय सुरू करून येथील युवकांनी आत्मनिर्भर व्हावे. यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत राबविलेल्या नोंदणी मोहिमेत Sheli Palan Anudan Yojana करण्याची इच्छा असलेल्या नवउद्योजकांनी बीजभांडवल किंवा मुद्रा (कृषी) योजनेच्या माध्यमातून बँकेत प्रस्ताव दाखल करावेत.

पहिल्या टप्प्यात २०२३ अखेर प्रथम उद्दिष्ट १०,००० शेळ्यांचे ठेवले आहे. उस्मानाबादी शेळी तिच्या खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध असून बाजारात या शेळीला चांगली मागणी आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे.

दि.१५/०७/२०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर ‘Sheli Palan Anudan Yojana भारत; आत्मनिर्भर धाराशिव’ अभियानाच्या अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुकांचे नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये एकूण १०,५०० नावांची नोंदणी करण्यात आली. त्यातील ३,११७ परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रा (DIC) कडे दाखल करण्यात आले असून यापैकी २,८५२ प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून अनेक जन बँकेकडून कर्ज प्राप्त करून स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करीत आहेत अथवा चालू व्यवसायाला वृद्धिंगत करत आहेत.

तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी आयोजित केलेल्या अनेक मार्गदर्शन शिबिरांच्या परिणाम स्वरूप जिल्ह्यातील अनेकांनी प्रस्ताव दाखल केले असुन प्रकल्प मंजुरीसह उद्योग सुरु देखील केले आहे. तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून कर्जाची फाईल तयार करण्यापासून ते कर्ज मंजूर करून देईपर्यंत सर्वकाही मदत केली जाते.

धाराशिव, कळंब, तुळजापूर या ३ तालुक्यातून एकूण प्रस्तावा पैकी ४९० प्रस्ताव शेळीपालनाचे आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या बीजभांडवल योजनेतून व मुद्रा (कृषी) योजनेतून प्रामुख्याने या प्रस्तावांना मंजुरी घेण्यात येणार आहे.

तसेच गरजेनुसार व्याज माफी, अनुदान स्वरूपात मदत मिळण्यासाठी वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर महामंडळाच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Shetjmin navavr krne / नवीन GR आला 100 रुपयेत नावावर जमिन

सर्व सामान्य कुटुंबासाठी शेळीपालन व्यवसाय अतिशय फायदेशीर असुन जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या व्यवसायासाठी प्रस्ताव दाखल करावे.

नाव नोंदणी व प्रस्ताव दाखल करण्याकरिता श्री.किरण आवटे – ९८५०५०९९२० यांना प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपर्क साधावा.

शेळी #व्यवसाय #शेती #धाराशिव #farmers #bussiness #dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *