Pik vima Bid pattern / शेतकऱ्यांनी असा मिळावा पिकविमा

मी गेल्या 3 वर्षांपासून वयक्तिक तक्रार नोंदवून Pik vima Bid pattern कम्पनी कडून पिकाची नुकसान भरपाई मिळवतो आहे.
गेल्या 2 दिवसापासून यामागे होतो काही नवीन गोष्टी माहीत पडल्या शेअर करतो …

माझ्या माहिती प्रमाणे 3 प्रकारे तक्रार नोंदवता येते.ही तक्रार नुकसान झाल्यावर 72 तासाच्या आत करणे आवश्यक आहे.

1) app च्या सहाय्याने
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
यावर ज्यांनी बँकेतून पिकविमा काढलेला नाही अश्यांसाठी अर्ज क्र(application number) टाकून . ज्यांनी बँकेतून काढला त्यांनी कर्जाच्या खात्याचा खाते क्रमांक टाकून तक्रार करू शकता.यामध्ये नुकसानाची दिनांक ,वेळ,नुकसानाची टक्केवारी, कारण टाकून अर्ज submit करायचा असतो .तो झाल्यावर एक टोकन id मिळतो.जो पुढील पाठलागासाठी गरजेचा आहे.
App वापरताना बरेचदा OTP येत नाही त्यामुळे ही प्रकिया लकी ड्रॉ सारख होऊन जाते.कुणाला येईल कुणाला नाही सांगत येत नाही.

Pik vima Bid pattern

2) टोल फ्री क्रमांक वापरून …(18001024088)

टोल फ्री क्रमांक वापरून तक्रार करताना जर आपण बँकेतून पिकविमा काढलेला नसेल तर आपल्या कडे पिकविमा भरल्याची पावती असणे गरजेचे आहे.बँकेतुन विमा काढलेल्या कर्जदारांनी कर्जाच्या खात्याचा खाते क्र जवळ ठेवावा. सोबतच नुकसानाचा वेळ व दिनांक..नुकसानाची टक्केवारी ,कारण इत्यादी विचारणा करून आपली तक्रार नोंदवली जाते सोबतच टोकन क्रमांक देण्यात येतो..हा टोकन क्रमांक जपून ठेवावा.(हा नम्बर सतत व्यस्त असतो त्यामुळे तक्रार नोंदवल्या जाई पर्यंत पिच्छा सोडू नका)

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना या योजनेची निधी बँक मध्ये जमा होणार

3) ऑफलाईन अर्ज करून:-
प्रत्येक तालुक्यात एक कम्पनीचा विमा प्रतिनिधी असतो किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे साधा अर्ज करावा त्यात आपल्या विमा पावतीचा अर्ज क्र. किंवा बँकेतून काढला असल्याचा कर्जाचा खाते क्र लिहावा यामध्ये नुकसानाची दिनांक ,वेळ,नुकसानाची टक्केवारी, इत्यादी माहीती लिहून पावती घ्यावी.नन्तर आपला टोकन क्र मिळवण्यासाठी प्रयन्त करावेत.

ही पण बातमी वाचा https://bit.ly/2UJRNqj

गेल्यावर्षी पासून कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडूनच पिकविमा काढावं हे बंधन हटवण्यात आले होते.पण बँकांनी जबरदस्ती करून कर्जदार शेतकऱ्यांन कडून पिकविमा भरून घेतला.बँक सर्व शेतकऱ्यांची रक्कम एकत्रित पाठवते म्हणून आता अजून पर्यंत त्या विम्याचे प्रीमियम भरल्या गेले नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा application id generate झालेच नाही.जर विम्याची रक्कम पोहचलीच नाही तर तुमचा id genrate होत नाही त्यामुळे तुम्हाला तक्रार करता येणार नाही.


एका वरिष्ठ बँकेच्या अधिकार्या सोबत 2 दिवसापासून या बाबत विचारणा सुरू होती ..आज विमा कम्पणीसोबत संगनमत झाले ऑफलाईन अर्ज विमा प्रतिनिधी यांच्याकडे पोहचवले तर ते स्वीकारले जातील . तुमच्या विम्याचा भरणा लवकरच कम्पनी पर्यंत पोहचवल्या जाईल अस आश्वासन त्यांनी दिलं.

मंडळी विमा कम्पनी कडून नुकसानभरपाई मिळवणे यात तक्रार करणे ही फक्त पहिली पायरी आहे..यापुढील पायरी पुढील पोस्ट मध्ये डिटेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो.

सोबतच अकोला व वाशिम जिल्ह्यातील विमा प्रतिनिधी यांचे सम्पर्क टाकले आहेत.

अधिक माहिती साठी इथे संपर्क

https://www.instagram.com/reel/CRyppRgH9iP/?utm_medium=copy_link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *