Pernisathi 10000 Madat / perniMadat / शेतकऱ्यांना पेरणी वेळी प्रत्येकी 10000 हजार

Pernisathi 10000 Madat || perniMadat ‘आदरणीय केंद्रेकर साहेब’ या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत व मनसे अभिनंदन.दिवसेंदिवस मराठवाड्यातील वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्येची कारणे शोधत त्या आत्महत्या कशा प्रकारे थांबवता येतील या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालय व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ५ लाख शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण केले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधला आहे. ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो आहे आशांना त्यांनी शोधलं त्यांचं समुपदेशन केलं

अर्ज आल्यास तुम्हाला या व्हाट्सअप ग्रुप मिळणार

imoji

ते साठी इथे क्लीक करून जॉइन करा

आणि त्यांना मदतीचं आश्वासन देखील दिलं आहे.साधारणता मराठवाड्यात दररोज २ शेतकरी आत्महत्या होतात याची कारणं शोधली असता शेतकऱ्याची आर्थिक बाजू,सामाजिक बाजू,घरी लग्नाला आलेल्या मुली,शिक्षण अर्धवट सोडायला लागलेली मुलं,नापिकी,अल्पशेती त्यामधून मिळणारं कमी उत्पन्न,सावकाराचे कर्ज,बँकेचे कर्ज,शेती पिकत नाही पिकल्यावर भाव मिळत नाही, रासायनिक खताचे Pernisathi 10000 Madat || perniMadat वाढलेले दर दुकानदाराकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक, मशागतीचा खर्च,जंगली जनावराकडून होणारी पिकांची नासधूस,मुलगी लग्नाला आली लग्न होत नाही- मुलगा लग्नाला आला त्याचं लग्न होत नाही.आडते,दलाल,व्यापारी यांच्याकडून होणारं शोषण अशा सगळ्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी कुंटुंबातील कर्त्या माणसाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि हे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. साहेब खरंच हे वास्तव असून आपण केलेल्या सर्वे मध्ये जे आढळून आले त्यामध्ये तथ्य आहे.

एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून साहेब आपण शेतकऱ्याचे आयुष्य बदलू शकणाऱ्या केलेल्या शिफारशीचे मी स्वागत व अभिनंदन करतो आणि राज्य शासन देखील (शिंदे फडणवीस सरकार) या केलेल्या शिफारशीचा विचार करून मराठवाड्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणाच्या धरतीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामातील पेरणी वेळी एकरी १० हजार रुपये निश्चित देईल अशी आशा बाळगतो तसेच मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी,सर्वपक्षीय नेतेमंडळी,या क्षेत्रातील जाणकार,तज्ञ व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या या शेतकरी हितार्थ मागणीला पाठिंबा देत ही मागणी शासन दरबारी लावून धरावी ही विनंती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *