घरबसल्या शेतकऱ्यांना मिळणार जुनी कागदपत्रे ( Old agricultural documents will be available at home )

Old agricultural documents will be available at home : मुंबई वगळता स्कॅनिंगचे काम अंतिम टप्प्यात पुणे: राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूमिअभिलेखांचे संगणकीकरण करून ते नागरिकांना
ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,

त्यासाठी जमिनीविषयक जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याकरिता ई-अभिलेख हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांचे जुने अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

20240121 103836

हे अभिलेख केवळ पाहण्यासाठी मोफत तर वापरासाठी सशुल्क उपलब्ध असतील..
मुंबई शहर वगळता सद्य:स्थितीत २२ जिल्ह्यांचे स्कॅनिंग काम पूर्ण झाले आहे. यामध्ये जुने सातबारा उतारे, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना
पत्रक, कमी जास्त पत्रक, आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी पाहण्यासाठी अभिलेख नोंदवही आदी असाक्षांकित अभिलेख पाहण्यासाठी
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या
संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत.

Old agricultural documents will be available at home : अपलोडिंग पूर्ण झालेल्या २२ जिल्ह्यांचे स्कॅन झालेले अभिलेख डिजिटली साक्षांकित करण्याचे कामकाज महसूल व भूमिअभिलेख
विभागाकडून पूर्ण झाले आहे. हे अभिलेख https://mahabhumi.gov.in
या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचे शुल्क नागरिकांना ऑनलाईन भरता येईल..
“निरंजन कुमार सुधांशू, जमाबंदी आयुक्त आणि

पीकविमा यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *