Nuksana Bharape Hektri
दिनांक १७ मे, २०२१ रोजी “तौक्ते” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील किनारपट्टीच्या व इतर काही
जिल्हयांमध्ये बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य
आपत्ती प्रतिसाद निधी /राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत
देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
Nuksana Bharape Hektri
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या दरामध्ये सदर घटनेसाठी “निसर्ग”
चक्रीवादळामध्ये देण्यात आलेल्या दरानुसार “तौक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय
मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. सदर बैठकीत घेतलेल्या
निर्णयानुसार “तौक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याच्या संदर्भात आदेश निर्गमित करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.
ही पण बातमी वाचापीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021
शासन निर्णयः
“तौक्ते” चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्हयात झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने बाधित
नागरिकांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
