nuksan bharpa manjur / नुकसान भरपाई मंजूर 2021

कोणते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

शेतातील वन्य प्राण्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांची, पशुधनाची तसेच मनुष्यहानी होऊन झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी nuksan bharpa manjur अशी मागणी बुलढाणाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली होती.त्यांनी केलेला पाठपुरावामुळे जिल्ह्याला वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तीन कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

कोणती नुकसान भरपाई मिळणार


बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर गंभीर जखमी होतात तर काही ठिकाणी मनुष्यहानी देखील होते. शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन दगावल्याच्याही मोठ्या घटना आहेत. सदरची नुकसानभरपाई एका महिन्यात देणे बंधनकारक असते परंतु जिल्ह्यातील 2019 – 20 आणि 2020 – 21 या दोन वर्षांमधील नुकसानभरपाईचे nuksan bharpa सर्व प्रकरणे प्रलंबित होते. झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आलेले होते परंतु अद्याप मदत देण्यात आली नव्हती.

ही पण बातमी वाचा राशन कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करा

कोणते शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत

कोरोना आणि त्यानंतर nuksan bharpa manjur यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. अशावेळी किमान वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई तरी त्यांना वेळेवर मिळावी, यासाठी रविकांत तुपकर यांनी उपवनसंरक्षक तथा संबंधित मंत्र्यांकडे मागणी केली होती. रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत वनविभागाला नुकसानभरपाईचे अनुदान म्हणून 3 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदर निधी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जात आहे. काही शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाली तर काहींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

FB IMG 1636607043987
रविकांत तुपकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *