Nanaji deshumkh krushi yojan / आजचे बाजार भाव

नमस्कार मित्रानो मार्केट मध्ये काही प्रमाणात बाजार भाव वाढत आहे मित्रानो रोज बाजार भाव पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

http://batmicorner.com

Nanaji deshumkh krushi yojan संजीवनी प्रकल्पांतर्गत, नवीन विहिरी मंजूर

या घटकासाठी साधारणत: प्रती गाव २ विहीर याप्रमाणे, प्रकल्पांतर्गत समाविष्ट सर्व ५१४२ गावांकरिता
लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे व सदर लक्षांकाच्या आधारे नवीन विहीर या घटकांची अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे.

संदर्भ क्र.२ व ३ नुसार, प्रकल्पांतर्गत नवीन विहीर राबवीत असताना,सुधारित तांत्रिक निकष देण्यात आले आहेत. या निकषाच्या आधारे नवीन विहीर हा घटक फक्त सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये राबविणे व संबधित लाभार्थ्याने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, अभिप्रेत आहे. प्रकल्पांतर्गत सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये समाविष्ट गावांची यादी यापूर्वीच आपणास पाठविण्यात आलेली आहे.

Nanaji deshumkh krushi yojan

वरील तांत्रिक निकषाच्या आधारे, नवीन विहीर हा घटक राबवीत असताना खालील मुद्दे विचारात घेऊन सदर घटकाची अंमलबजावणी अधिक गतिमान व पारदर्शकपणे होण्यासाठी,तसेच शेतकऱ्यांना सदर घटकाचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यास्तव सुधारित कार्यपद्धती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे-

ही पण बातमी वाचा शेतमालाला दिडपट हमिभाव देण्याचे सरकारचे उदिष्ठ farmer news/ budget 2021

१. संदर्भ क्र.२ नुसार, प्रकल्पांतर्गत देण्यात आलेला नवीन विहीर या घटकाचा लक्षांक हा फक्त सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील गावांकरिता राबविणे अभिप्रेत आहे (संदर्भ क्रमांक ३ नुसार). म्हणजेच, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) च्या व्याख्येप्रमाणे सेमी क्रिटीकल,

क्रिटीकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रातील गावामधून नवीन विहीर या घटकांचे प्रलंबित अर्ज डेस्क १,२ व ३ वरून रद्द करण्यात यावेत.

२. सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील समाविष्ट गावांची संख्या विचारात घेऊन सुरक्षित पाणलोटातील प्रत्येक गावासाठी प्रती गाव ३ विहिरींचा लक्षांक निर्धारित करण्यात येत आहे.

३. विहिरींसाठी प्राप्त सर्व अर्जाची तांत्रिक निकषाच्या आधारे पडताळणी करून,तांत्रिकदृष्ट्या निकष पूर्ण करणारे सर्व अर्ज डेस्क-३ वर तात्काळ पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी व त्यानंतरच प्रती गाव ३ विहिरीप्रमाणे मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

४. विहीर या घटकास पूर्वसंमती देताना, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी डेस्क -३ वर प्राप्त सर्व पात्र अर्ज अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग व इतर या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलवर दिसत असल्याने त्याच क्रमाने एका गावासाठी

३ विहीर याप्रमाणे पात्र अर्जदारांना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणेबाबत अवगत करावे व त्यानंतरच पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

५. संबधित गावातील ३ नवीन विहिरीस पूर्वसंमती देत असताना,त्या गावात यापूर्वी दिलेली पूर्वसंमती संबधित गावासाठीच्या लक्षांकातून वजा करण्यात यावी.तसेच गावनिहाय दिलेल्या पुर्वसंमतीची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात यावी.

६. संबधित गावातील ३ अर्जाना पूर्वसंमती दिल्यावर, उर्वरित अर्ज हे hold वर ठेवण्यात यावेत.

७. पूर्वसंमती दिलेल्या लाभार्थ्यांनी, विहित कालावधीत (पूर्वसंमती प्राप्त झाल्यापासून ३० दिवसाच्या आत) घटकाची अंमलबजावणी सुरु केली नसल्यास,संबधित शेतकऱ्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल, याची लाभार्थ्यास जाणीव करून देण्यात यावी.

८. पूर्वसंमती प्राप्त लाभार्थ्यांनी “विहीर पूर्न:भरण” करणे बंधनकारक राहील. त्यासाठी विहीर पूर्न:भरण बाबीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. “विहीर पूर्न: भरण” ही बाब पूर्ण केल्यानंतरच नविन विहीर या बाबीचे अंतिम प्रदान करण्यात यावे..

यादी पाहणे साठी इथे क्लीक करून loging करा


https://dbt.mahapocra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *