nanaji Deshmukh krushi sanjivani prakalp / शेतकऱ्यांना या योजनेची निधी बँक मध्ये जमा होणार

प्रस्तावना:-
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा nanaji Deshmukh krushi sanjivani prakalp राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास
अनुकूल शेती पध्दती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्याटप्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाहय हिश्श्याचा रु.१७५ कोटी आणि राज्य हिश्श्याचा रु. ७५ कोटी असा एकूण रु.२५० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

nanaji Deshmukh krushi sanjivani prakalp

प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रान्वये प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाखाली शिल्लक असलेला रु.२०२.४३ कोटी (बाह्य हिस्सा रु.१७५.०० कोटी आणि राज्य रु.२७.४३ कोटी) निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने प्रकल्पाच्या
अंमलबजावणीसाठी बाहय हिश्श्याकरिता रु.१७५ कोटी आणि राज्य हिश्श्याकरिता रु.२७.४३ कोटी असा एकूण २०२.४३ कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

ही पण बातमी वाचा शेळीपालनसाठी मिळणार 250000 लाख रुपये

शासन निर्णय:
१. सन २०२१-२२ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रु.२०२.४३ (रु.दोनशे दोन कोटी त्रेचाळीस लाख फक्त) अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत
असून सदर वितरीत करण्यात येत असलेल्या निधीपैकी बाहय व राज्य हिश्श्याच्या निधीचा


तपशील खालीलप्रमाणे:-
(रु. कोटीत) बाहय हिश्श्याचा निधी राज्य हिश्श्याचा निधी
एकूण वितरीत निधी १७५ २७.४३ २०२.४३

Screenshot 2021 06 29 00 22 44 102 com.google.android.apps .docs


२. परिच्छेद क्रमांक १ येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाहय हिश्श्याचा रु.१७५ कोटी निधी (रु.एकशे पंच्याहत्तर कोटी फक्त) व राज्य हिश्श्याचा रु.२७.४३ कोटी निधी (रुपये सत्तावीस कोटी त्रेचाळीस लाख फक्त) वितरीत करण्यात
येत असून तो प्रकल्पाच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

नोकरी मिळणार असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *