पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात ( Claim Crop Insurance )

Claim Crop Insurance : धारेवर धरताच 48 तासाच्या आत तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा बँक खात्यात जमा होण्यास  सुरुवात.

हिंगोली जिल्हातील कृषी अधीक्षक यांच्या नाकर्तेपणामुळे व बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा विमा परत गेला होता त्यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी सदरचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांकडे मांडून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केलेल आहे.

20240312 153643
Claim Crop Insurance

प्रशासकीय नाकर्तेपणामुळे तोंडचा घास हिरावून घेतल्यानंतर आमदार  साहेबांनी केलेल्या प्रयत्नाने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भेटणार असे चिन्ह दिसू  आले  नंतर पुन्हा एकदा सदरची पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावून आमदार संतोष बांगर साहेब यांनी दोन-चार दिवसात माझ्या शेतकरी बांधवांचा पिक विमा नाही मिळाला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशाराच दिला नंतर प्रचंड वेगाने सूत्रे हलली आणि 48 तासाच्या आत तक्रारदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम बँक खात्यात पडण्यास सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांना 60000 रुपये अनुदान मिळणार

Claim Crop Insurance : भूमिका न घेता शेतकऱ्यांसाठी शिवसेना स्टाईल ने कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणून 48 तासाच्या आत तक्रारदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याने शेतकरी बांधवांनी सुद्धा समाधान व्यक्त करून आमदार बांगर साहेबांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *