Apale srakar shetkari yojana / आपले सरकार शेतकरी योजना

Apale srakar shetkari yojanaशेतकऱ्यांना या योजने वर मिळणारा अनुदान
ट्रॅक्टर ,कांदाचाळ, शेती औजारे, ठिबक,

आपले सरकार DBT हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे.

Apale srakar shetkari yojana

राज्य DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध DBT योजनांसाठी आणि कृषी योजनांमार्फत सुरु होणाऱ्या विविध सेवांसाठी आंतरिक कार्यप्रवाह व्यवस्थापन आणि सामग्री व्यवस्थापनाचे व्यासपीठ तयार करणे, हे आपले सरकार DBT योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

१. आपले सरकार DBT ची मुख्य वैशिष्ट्ये:

ही पण बातमी वाचाशेतकऱ्यांनाचा मुलांना मदत


शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार DBT च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत
कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Bhausaheb Fundkar falbag yojana /भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड योजनेत

शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात.
सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी ७/१२ प्रमाणपत्र, ८ अ प्रमाणपत्र, आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.

आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टची तरतूद,
नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभ वितरण, मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया, भूमिका आधारित युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध.

विभाग / राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे कृषी योजना अर्जाच्या देखरेखीची पारदर्शकता.

२.शेतकऱ्यांसाठी आपले सरकार DBT वर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून आधार क्रमांक आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेले शेतकरीसुद्धा आपले सरकार DBT पोर्टलवर नोंदणी करू शकतात.

अर्जदारांना सूचित केले जाते, कृपया मार्गदर्शक पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे आणि आपले सरकार
DBT पोर्टलवर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेणे.

कृषी योजनेसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष (पात्रता विभाग
तपासा) पूर्ण करण्यासाठी अर्जदार पात्र आहे कि नाही, याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल.

अर्जदाराची पात्रता कोणत्याही स्तरावर अवैध आढळून आली, तर त्याचा / तिचा अर्ज रद्द करण्यात येईल.
अर्जदाराने अंतिमतः अर्ज जमा करण्यापूर्वी त्याच्या / तिच्या द्वारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत का, हे
तपासून घ्यावे, कारण त्यानंतर किरकोळ बदल करण्यासाठी अर्ज परत पाठविण्यास केवळ माहिती संपादित
करण्यासाठी तरतूद असेल..

कृषी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाईनद्वारेच असेल. अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जामध्ये “*” चिन्हासह जे चिन्हांकित क्षेत्र आहेत, ते भरणे अनिवार्य आहे.

३.आपले सरकार DBT पोर्टल प्रवेश


आपल्या प्रणाली (डेस्कटॉप किंवा लॅपटॉप) च्या कोणत्याही स्थापित ब्राऊझरचा वापर करा,
सहाय्यक ब्राउझर खालीलप्रमाणे:
Internet Explorer (IE), Google Chrome, Mozilla Firefox

शिफारस केलेले आवृत्ती :
10+ 55+ 54+ आपले सरकार DBT मुख्यपृष्ठ पाहण्यासाठी आपले सरकार DBTची https://mahadbtmahait.gov.in हि वैध युआरएल प्रविष्ठ करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *