25 Tkke Nuksan barape / २५% अग्रीम नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

25 Tkke Nuksan barape रक्कम बाधित पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना !
आ राणा जगजितसिंग पाटील :
‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अंतर्गत बळीराजाला नैसर्गिक आपत्तीपासून सक्षम असे संरक्षण देण्याचे काम देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी केले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम राज्य सरकार करत आहे.

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यात जोरदार पाऊस

केंद्र व राज्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच बरोबर ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ च्या निकषानुसार ज्या भागात हंगामा दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ५०% पेक्षा जास्त नुकसान अपेक्षित आहे अशा विमाधारक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५% आगाऊ रक्कम देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद आहे. या रक्कमेमुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला अनुदानासह अधिकचा आर्थिक दिलासा लवकर मिळणार आहे.

पोलिस दल मध्ये नोकरी भरती

कृषी व महसूल यंत्रणा व पिक विमा कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने निकषांप्रमाणे पाहणी करणे, ७ दिवसांत नुकसानी बाबत आदेश काढणे व १५ दिवसांत नुकसानीचा अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ च्या निकषांप्रमाणे अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५% आगाऊ रक्कम बाधित विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे’ जिल्हा कार्यवाहक तथा जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांना देण्यात आली आहे.

25 Tkke Nuksan barape

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *