सोयाबीन पिकाची अशी soybin lagvadha करा लागवड संपूर्ण माहिती

 1. सोयबीन सल्ला soybin lagvadha 
  नमस्कार शेतकरी मित्रांनो,
  खरीप हंगाम जवळ आलाय. शेतीच्या मशागतीस सुरुवात झाली असेलच.
  पेरणीचे नियोजन पण सुरु असेल. मित्रांनो, पीक उत्पादन करत असतांना बियाणे,
  रासायनिक खते आणि कीड व रोग व्यवस्थापनाकरीता कराव्या लागणा-या फवारण्यावर
  आपला खूप खर्च होतो. पीक उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच आपल्या शेतात कीड
  आणि रोगांचे प्रमाण कमी रहाण्याकरिता खालील बाबींचा अवलंब खूप महत्वाचा आहे
  1. पेरणीपूर्वी soybin lagvadha 
  – उन्हाळयात शेताची खोल नांगरणी करावी व उन्हात शेत तापू द्यावे त्यामुळे पाने
  खाणा-या अळयांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते तसेच मशागती दरम्यान
  कीटकभक्षी पक्ष्यांनी वेचून खाल्यामुळे पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी
  होण्यास मदत होईल.
  – माती परिक्षण करुन घ्यावे. माती परिक्षण अहवालावर आधारित रासायनिक
  खतांच्या वापराचे नियोजन करावे. तेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधक वापरावे.
  – सोयाबीन पिकाच्या खोडात चक्रभुंग्याची अळी सुप्तावस्थेत रहात असल्यामुळे
  सोयाबीन पिकाचे अवशेष (धसकटे/काडीकचरा) नष्ट करावा.
  V एकाच जमिनीत दरवर्षी सोयाबीनचे पीक घेऊ नये. पिकांची फेरपालट करावी
  2. पेरणी करतांना soybin lagvadha 
  – चक्रभुंग्याचा नियमीत प्रादुर्भाव होत असलेल्या भागात जूनच्या शेवटच्या
  आठवडयापर्यंत पेरणी आटोपावी. उशिरात उशीरा 15 जुलै पर्यंत पेरणी आटोपावी
  – पेरणीपूर्वी रायझोबियम जॅपोनिकम 5 मिली आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू
  (पीएसबी) संवर्धन 5 मिली या प्रमाणे बीजप्रक्रीया करावी
  . कीड व रोगांना सहनशील जातींची निवड करावी
  – बियाण्याचे प्रमाण शिफारसीनुसारच वापरावे
  पीक उत्पादन खर्च ठेवा कमी, मिळेल पिकातून उत्पन्नाची हमी

– Iखोडमाशीच्या व्यवस्थापनाकरीता थायमेथोक्झाम 30 एफ एस 10 मिली प्रति किलो
बियाण्यास चोळून पेरणी करावी
– बुधा सड, चारकोल सड किंवा इतर रोपावस्थेतील रोगांच्या व्यवस्थापनाकरीता
कार्बोक्झीन 37.5 + थायरम 37.5 डब्ल्यू एस या मिश्र बुरशीनाषकाची 3 ग्रॅम प्रति
किलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रीया करावी किंवा रोपसड रोग’
व्यवस्थापनाकरीता थायोफेनेट मिथाईल 450 ग्रॅ/लि + पायराक्लोस्ट्रोबिन 50
एफ एस या संयुक्त बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया करावी
मुख्य पिकाभोवती एरंडी, सुर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ पेरावी
– पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतर वापरावयाच्या तणनाशकांची फवारणी करुन पीक soybin lagvadha

7 माती परिक्षण करुन घ्यावे. माती परिक्षण अहवालावर आधारित रासायनिक
खतांच्या वापराचे नियोजन करावे. तेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधक वापरावे.
– सोयाबीन पिकाच्या खोडात चक्रभुंग्याची अळी सुप्तावस्थेत रहात असल्यामुळे
सोयाबीन पिकाचे अवशेष (धसकटे/काडीकचरा) नष्ट करावा.
एकाच जमिनीत दरवर्षी सोयाबीनचे पीक घेऊ नये. पिकांची फेरपालट करावी

तणमुक्त ठेवावे
कीड व रोगास सहनशील /प्रतिकारक सोयाबीनच्या जातींची माहिती
जातीचे नाव
प्रसारण उत्पादन वैशिष्टय
क्षमता(क्वि/हे)
के डी एस ३४४ २०१५ २५.५५ तांबेरा रोगास सहनशील
(फुले अग्रणी)

एम ए यु एस २०१४
बुरशीजन्य ठिपके आणि जीवाणूजन्य
१६२

रोगास आणि किडीस प्रतिकारक
जे एस २०-३४ २०१४ २२-२५ चारकोल रॉट आणि चक्र ग्यास प्रतिकारक
आणि खोडमाशीस मध्यम प्रतिकारक
एम ए यु एस

जीवाणूजन्य पुरळ, रायझोक्टोनिया करपा,
१५८
बुंधा सड, चारकोल रॉट रोगास सहनशील

जे एस ९५-६० २००७ १८-२० खोड माशी आणि अळीस तसेच
जीवाणूजन्य पुरळ आणि मूळसड रोगास

प्रतिकारक, चक्रभुंग्यास मध्यम प्रतिकारक
जे एस ९३०५ २००२ २०-२५ प्रमुख रोग आणि किडीस प्रतिकारक
एम ए यु एस ७१ २००२ २०-२५
जे एस ३३५ १९९४ २५-३० जीवाणूजन्य पुरळ रोगास सहनशील तर
येलो व्हेन मोझाक रोगास बळी पडते

महत्त्वाच्या सुचना

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

१) विहीर अथवा तलावाचे किंवा शेत तळयाचे पाणी फवारणी करिता घेतल्यास अति उत्तम परंतु बोअरचे पाणी तुरटी फिरवून शुध्द करुनच घ्यावे.

२) कोणतीही फवारणी करण्यापुर्वी ओल असणे गरजेचे आहे.

३) कोणत्याही पिकाला कोणतेही तणनाशक कोरे वापरु नये प्रत्येक टाकीत २० ग्रॅम युमिक जेल टाकणे आवश्यक आहे..

४) वहीतीच्या जमिनीवर सोयाबीनचा भुसा (कुडाळ) टाकू नये अन्यथा जमीन नापिक होते.

५) कोणत्याही फवारणीच्या जवळपास आमावश्या असेल तर फवारणी मागे पुढे करावी. आमावश्याच्या प्रारंभीच्या २४ तास अगोदर फवारणी संपवावी हा मुख्य मुद्दा आहे.

६) फवारणी करतांना नाक व तोंड पूर्णपणे चाकून घ्यावे.
खरीप हंगामाकरीता शुभेच्छा,
काळजी घ्या आणि सुरक्षित रहा

पीक उत्पादन खर्च ठेवा कमी, मिळेल पिकातून उत्पन्नाची हमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *