sichan Vihir Anudan
संदर्भाधीन शासन निर्णय दि.१७ डिसेंबर, २०१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींसंदर्भात सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या.
त्या अनुषंगाने विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार सहकार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आला. तद्नंतर संदर्भाधीन शासन पत्र दि.२८ नोव्हेंबर, २०१७ अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले.

सदर अधिकार पुन्हा गटविकास अधिकारी,
पंचायत समिती यांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू
sichan Vihir Anudan
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार सह कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात येत आहेत.
