Shetal / मागेल त्याला शेततळ संपूर्ण महिती

मागेल त्याला शेततळ Shetal
अलीकडील काळात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे
जिरायती शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनावर विपरीत
परिणाम झाला आहे. शेतीच्या उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच
दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. राज्यातील पावसावर
आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून
जलसिंचना
वाढविण्यासाठी, संरक्षित व शाश्वत सिंचनाची
सुविधा निर्माण करण्यासाठी, ऐन टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेततळ्यात
साठलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा व वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान
उंचावण्यास मदत व्हावी, यासाठी शासनाच्या नियोजन विभागाने १७
फेब्रुवारी २०१६ रोजी मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला.
लाभार्थी पात्रता-
शेतकऱ्यांच्या नावे कमीत कमी ६० गुंठे जमीन असावी.
यापूर्वी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून शेतकऱ्याने वैयक्तिक
किंवा सामूहिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणाऱ्या बोडी या
घटकांचा लाभ घेतलेला नसावा.
मागील पाच वर्षांत किमान एक वर्ष तरी शेतकऱ्याला ज्या गावात
शेततळे घ्यावयाचे आहे, त्या गावांची आणेवारी अर्थात पैसेवारी ५०
पैशांपेक्षा कमी असावी.
 शेत जमीन शेत तळ्यासाठी तांत्रिक दृष्ट्या योग्य असावी.
लाभार्थी निवडीसाठी प्राधान्यक्रम-
दारिद्र्य रेषे खालील शेतकरी
• ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा कुटुंबातील वारसांना निवडप्रक्रियेत
प्राधान्य
• या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची
ज्येष्ठता यादीनुसार निवड (प्रथम अर्ज सादर करणाऱ्याला पहिल्यांदा प्राधान्य)
• आवश्यक कागदपत्रे
सात बाराचा उतारा-
८अ चा उतारा –
दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीसाठी रेशन कार्डची झेरॉक्स किंवा ती उपलब्ध
नसल्यास दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव असल्याचा ग्राम सेवकांचा दाखला
• आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा वारसाचा दाखला –
अर्जासाठी सेवा शुल्क रुपये २० व अधिक सेवा कर
• प्रपत्र २ मधील विहित नमुन्यातील अर्ज

.शेततळ्यासाठी जमिनीची निवड-
• काळी जमीन, ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य
असल्याने अशा जमिनीची निवड करावी.
क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.
मुरमाड, वालुकामय सच्छिद्र खडक जमीन शेततळ्यास निवडू नये.
ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी
घेण्यात यावीत.
नाल्याच्या ओहळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यासाठी जागेची निवड करू नये.
• इनलेट व आऊटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणी
साठा क्षमतेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिखल होईल, तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून
लगतच्या शेतकऱ्यांच्या स्थावर जंगम व शेतीचे नुकसान होईल, अशा जमिनीची शेततळ्यासाठी
निवड करू नये.
शेततळ्यासाठी  Shetal ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-
। प्रत्येक वर्षी शासनाच्या वतीने राज्यात शेततळी उभारणी करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले
जाते व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांची मुदत दिली जाते.
.
शेततळ्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे
शेतकऱ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचे आहे. त्यासाठी
शेतकऱ्यांनी या योजनेसाठी वर नमूद केलेली कागदपत्रे पहिल्यांदा स्कॅन करावीत व ऑनलाईन कागदपत्रे
लवकर अपलोड व्हावीत. यासाठी प्रत्येक कागदपत्रांची फाईल स्वतंत्र असणे अधिक फायद्याचे यानंतर
शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर जावे.
– या संकेतस्थळावरील ‘मागेल त्याला शेततळे’ यावर क्लिक करावे.
– त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांने संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्जाची माहिती भरावी.
अर्जावर स्वाक्षरी करून हा अर्जदेखील स्कॅन करावा व सर्व कागदपत्रे अपलोड करावीत. यानंतर संगणकीय
प्रणालीद्वारे या अर्जाची पोहच पावती शेतकऱ्यांना मिळते.
– शेततळे खोदण्यास परवानगी संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांना या
योजनेच्या लाभासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या नावासह सर्व माहिती सादर केले जाते.
– तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने निकषानुसार, प्राधान्यक्रमानुसार पात्र लाभार्थीच्या नावाची यादी छाननी
करून तयार केली जाते व ही यादी जिल्हा कृषी अधीक्षकाकडे मान्यतेसाठी पाठविली जाते
– तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी साहाय्यक कृषी सेवक व कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत
गावातील मंजूर लाभार्थीच्या शेततळ्याचे अंदाजपत्रक तयार केले जाते व ते तांत्रिक मंजुरीसाठी सादर केले
जाते.
० तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेल्या यादीतील लाभार्थांच्या शेततळ्याला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने
तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली जाते. ही मान्यता आल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने शेततळे मंजूर
झालेल्या शेतकऱ्याला शेततळे खोदण्यास परवानगी अर्थात वर्क ऑर्डर दिली जाते.
शेततळे खोदण्यास परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची जबाबदारी-
कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर लाभार्थीनी ३० दिवसांच्या आत शेततळ्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे.
शेततळे योग्य आकारमानात येण्यासाठी कृषी साहाय्यकांकडून शेतकऱ्यांनी ज्या गटात शेततळ्याची मागणी केली आहे, त्या
गटात शेततळे खोदण्यासाठी लाईन आऊट घ्यावा.
शेतकऱ्याने स्वतः, मजुरांद्वारे किंवा जेसीबी, पोकलेनच्या मदतीने शेततळे खोदावे.

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

• शेततळ्याची खोदाई पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधित तालुका कृषी कार्यालयाला लेखी कळवावे व त्यासोबत शेततळ्याचे
अनुदान शेतकऱ्यांच्या नावावर जमा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या पास बुकची झेरॉक्स जोडावी. मात्र त्यावर खाते
क्रमांक, बँकेचा आयएफसी व एमआरसीआर कोडचा व शाखेचा उल्लेख असणे गरजेचे आहे.
अनुदान जमा होण्याची प्रक्रिया -शेतकऱ्याने तालुका कृषी कार्यालयाला कळविल्यानंतर ३० दिवसांच्या आत बँक खात्यावर जमा
करणे बंधनकारक आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी साहाय्य किंवा सेवकांच्या वतीने शेतकऱ्याने खोदलेल्या
शेततळ्याचे मोजमाप घेतले जाते. त्यांची नोद मोजमाप पुस्तिकेत केली जाते. शेततळ्याच्या आकारमानाच्या मापदंडानुसार
,अनुदान शेतकऱ्यांच्या नावावर जमा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या पास बुकची झेरॉक्स जोडावी. मात्र त्यावर खाते
क्रमांक, बँकेचा आयएफसी व एमआरसीआर कोडचा व शाखेचा उल्लेख असणे गरजेचे आहे.
अनुदान जमा होण्याची प्रक्रिया -शेतकऱ्याने तालुका कृषी कार्यालयाला कळविल्यानंतर ३० दिवसांच्या आत बँक खात्यावर जमा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरळसेवा भरती | PCMC Bharti 2022 | Mahanagarpalika Bharti 2022

करणे बंधनकारक आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी साहाय्य किंवा सेवकांच्या वतीने शेतकऱ्याने खोदलेल्या
शेततळ्याचे मोजमाप घेतले जाते. त्यांची नोद मोजमाप पुस्तिकेत केली जाते. शेततळ्याच्या आकारमानाच्या मापदंडानुसार
अनुज्ञेय असलेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्याला देण्यासाठी शिफारस केली जाते. तसेच यासोबत लाभार्थीसह शेततळ्याचा
फोटो जीपीएस प्रणालीद्वारे अपलोड केला जातो. त्यासाठी शेततळ्याचे नैर्ऋत्य कोपऱ्यांच्या जागेचे अक्षांश व रेखांश यांची नोंद
घेतली जाते. हा फाटा भी खात्याच्या अधिकाऱ्याने अपलोड केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्याला अनुदान दिले जात नाही.
ऊपी ( विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *