shet rsta Milnara / शेतरस्ता मिळणे साठी असा करा अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो shet rsta Milnara साठी असा करा अर्ज शेतकरी मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक उदाहरण म्हणून मी माझ्या नावाचा अर्ज भरून दाखवला आहे. या अर्जात शेतकऱ्यांनी आपली स्वत:ची माहिती लिहिणं अपेक्षित आहे.

ही पण बातमी वाचा शेतरस्ते, गाडीमार्ग, पायवाट मिळवण्याची सुवर्णसंधी | शेतरस्ता GR

आता सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा ते पाहूया.

प्रति,

मा तहसिलदार साहेब,

( गावाचे नाव ) (तालुक्याचं नाव)

अर्ज – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.

विषय – शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.

अर्जदाराच्या जमिनीचा तपशील –

नाव – , गाव – , जिल्हा –

गट क्रमांक – 595, क्षेत्र – 1.30 हे.आर., आकारणी – 4.14 रुपये (कराची रक्कम)

लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता –

इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं.

shet rsta Milnara

त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता…

मी . गाव येथील कायम रहिवासी आहे. येथील गट क्रमांक — मध्ये माझ्या मालकीची — हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

ही पण बातमी वाचा बांधकाम ठेकेदारी

तरी मौजे , ता. येथील गट क्रमांक — मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.

आपला विश्वासू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *