Shard Pawar Gramsmruddhi Yojana / गायगोठा शेळीपालन शेड कुक्कुटपालन योजना सुरु 2021 100 % अनुदान |

विकसीत करण्यात येईल.
त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काही योजनांच्य संयोजनातून (Combination) “शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना राबविण्यास शासन (Shard Pawar Gramsmruddhi Yojana )मान्यता देत आहे.

शासन निर्णय :-
त्या अनुषंगाने, ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार(Shard Pawar Gramsmruddhi Yojana) ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत खालील नमूद केलेल्या ४ वैयक्तिक कामांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात यावे.
दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ शा .नि मधील एका गावात जास्तीत जास्त ५ गोठयांची मर्यादा या शासन निर्णयान्वये वगळण्यात येत आहे.

१) गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे
सद्य:स्थिती:-

ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठयाची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांधले जातात. गोठयांमध्ये मोठया प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते तसेच पावसाळ्याच्या दिवसांत गोठयातील जमिनीस दलदलीचे स्वरुप प्राप्त होते व सदर जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या
आजारांना बळी पडतात.

ही पण बातमी वाचा घर किंवा शेती 200 रुपयेत होणार नाव वर/ फक्त यांची च होणार

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पाहच..

तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. तर काही वेळेस गाई/म्हशींची कास निकामी होते, त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात.

बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा

शासन निर्णय क्रमांकः मग्रारो-२०२०/प्र.क्र.७०/रोहयो-७
खात नाही व हा चारा वाया जातो. हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठयामध्ये जनावरांना चारा व खाद्य
देण्यासाठी गव्हाण बांधणे अत्यावश्यक आहे.

सुधारणेची गरज :-
गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा संचय
करता न आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे
सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात
सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा
करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.

अनुज्ञेयता:-
नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन
(रोहयो) विभाग शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.७ तरतुदींनुसार, ६
गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असावी.
गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात यावे.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात यावी.

घरकूल यादी पहाणे साठी इथे क्लीक करा https://abmarathi.com/?p=520

वरील लिंक क्लीक करून नक्की पहा

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक
लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.

गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत रु.७७,१८८/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

रु.६,१८८/- (प्रमाण ८ टक्के)
रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के)
एकूण रु.७७,१८८/- (प्रमाण १०० टक्के)
तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल.

प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक/जिल्हा कार्यक्रम सह
समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

उपरोक्त शासन परिपत्रकातील ६ गुरांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते ६ गुरे करिता एक
गोठा व त्यानंतरच्या अधीकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त
गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील मात्र ३ पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. अकुशल खर्च कुशल खर्च

Gr पाहणे साठी इथे क्लीक करा

https://t.me/joinchat/SvXU7I9Yz1_YnASK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *