poltri farm anudan / कुक्कुटपालन वर मिळणार अनुदान

परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

कुक्कुटपालन.poltri farm हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.

उद्देश:
१. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदन उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविणे.

२. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत म. स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.

३. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालन poltri farm व्यवसायास चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबानाप्रथिनेयुक्त आहार मिळावा.

लाभार्थी निवडीचे निकष


प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकरी यांना लाभ देय राहील.

अर्थसहाय्य :
सदर घटकांतर्गत देशी वाणांच्या कोंबडीची poltri farm anudan चार आठवडे वयाची पिल्ले घेणे अभिप्रेत आहे. चार आठवडे
वयाच्या पिलाची किंमत रु. १००/- प्रती पक्षी मर्यादेत निर्धारित करणेत येत आहे.

एका पिलाच्या निवाऱ्यासाठी poltri farm 1चौ.फुट जागा आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १०० पक्षांसाठी अर्थसहाय्य देय आहे. जुने पक्षी असतील तर जुने व नवीन मिळून एकूण १०० पक्षी होतील या मर्यादेपर्यंत नवीन पक्षांचीखरेदी करता येईल.

नव्याने खरेदी केलेल्या पक्षांसाठी व त्यांच्या निवाऱ्यासाठीच अनुदान देय राहील. या घटकांतर्गत ५० किंवा ५० पेक्षा जास्त पक्षी खरेदी करणे अनिवार्य आहे. निवाऱ्यासाठी रु. ७०/- प्रती चौ.फुट प्रमाणे मापदंड असून आवश्यकता असल्यास लाभार्थ्याने स्वत:च्या जागेवर स्वत:चे अथवा बाजारातून साहित्य उपलब्ध करून निवाऱ्याची सोय करावयाची आहे.

खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५०% व अनुसूचीत जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ७५% अनुदान देय आहे. एका लाभार्थ्याने १०० पक्षी खरेदी करून निवाऱ्याची सोय केल्यास पक्षी खरेदीसाठी रु.१००००/- व निवाऱ्यासाठी रु. ७०००/- खर्चाचा मापदंड आहे.

Pm kisan sathi arj / वर्षंला 6000 हजार रुपये मिळणार असा करा अर्ज

त्यानुसार खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी एकूण खर्च रु.
१७०००/- च्या ५०% म्हणजेच रु. ८५००/- तर अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी ७५% म्हणजेच
रु. १२७५०/- अनुदान देय आहे. मापदंडाव्यतिरिक्त जादाचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. या
घटकासाठी अर्ज केलेल्या परंतु अदयाप पक्षी खरेदी न केलेल्या लाभार्थ्यांना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य देय राहील.

अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या
लाभार्थी

१. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठीचा प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

२. पूर्वसंमती मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत पक्षी खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
३. निवडलेल्या लाभार्थीने ग्राम कृषि संजीवनी समिती स्तरावर गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत पक्षी खरेदी करावी.

४. पक्षी खरेदी स्थानिक बाजारामध्ये poltri farm anudan ज्या गावामधील बाजारात पक्षी खरेदी केली आहे त्या ग्रामपंचायतीची पक्षी खरेदी बाबतची तपशिलासह पावती सादर करणे आवश्यक आहे.

लाभार्थीच्यापसंतीनुसार दिलेल्या मापदंडानुसार देशी वाणाची पिल्ले ही स्थानिक पुरवठादाराकडून / अंडी उबवणी
केंद्राकडून ग्राम कृषि संजीवनी समिती स्तरावरील पक्षी खरेदी समिती समवेत खरेदी करू शकतो.

५. पक्ष्यांसाठी आवश्यक आकारमानाच्या निवाऱ्याची सोय स्थानिक अथवा बाजारातून साहित्य घेऊन
करावयाची आहे

ही पण वाचा पीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021

वरील लिंक वर क्लीक करून नक्की वाचा

६. परसबागेतील कुक्कुटपालन poltri farm घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी करावी. सोबत
खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकीत करुन ऑनलाईन
अपलोड कराव्यात.
७. पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.
पक्षी खरेदी समिती:
१. सरपंच – पदसिद्ध अध्यक्ष
२. उपसरपंच – पदसिद्ध सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *