PMFBY 2022 / 25 तारखी ला पीकविमा बँक खात्यात

खरीप २०२० पीक विमा प्रकरणी आपण PMFBY 2022 केलेल्या अवमान याचिकेवर झालेल्या सुनावणीत मा.सर्वोच्च न्यायालयाचे बजाज अलायंझ विमा कंपनीला १५० कोटी रुपये दि.२५/११/२०२२ पर्यंत मा.उच्च न्यायालयात जमा करण्याचे व १० दिवसात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होईल !खरीप २०२० मध्ये पिकांच्या नुकसानीपोटी ३ आठवड्यात भरपाई देण्याच्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे बजाज अलायंझ विमा कंपनी विरोधात याचिकाकर्ते श्री.प्रशांत लोमटे यांच्यासह राज्य सरकारने अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मा.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.सदरील सुनावणी मध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.सुधांशु चौधरी यांनी विमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.०५/०९/२०२२ च्या आदेशाला २.५ महिने होऊन देखील पूर्णतः पालन न करून न्यायालयाचा अवमान केला आहे, हे पटवून देत विमा कंपनीला ३४४ कोटी रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश देण्याची विनंती केली.यावर विमा कंपनीच्या वतीने ॲड.कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

PMFBY 2022

मा. न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस काढू नये, अशी विनंती करत तातडीने शपथपत्र दाखल करण्यासह दि.२५/११/२०२२ पर्यंत १५० कोटी रुपये मा.उच्च न्यायालयात जमा करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.याचिकाकर्त्यांचे वकील ॲड.चौधरी यांनी सदरील १५० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली. यावर आधी ही रक्कम मा.उच्च न्यायालयात जमा होऊ द्या व विमा कंपनीचे शपथपत्र दाखल होऊ द्या जेणेकरून याचा याचिकाकर्त्यांनाच उपयोग होइल असे मत मा.न्यायाधिशांनी व्यक्त केले.

Buldhana Pikvima Live / पीकविमा अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *