पीकविमा खात्यात येणास सुरवात / PM Pik Vima Scheme

PM Pik Vima Scheme : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अग्रीम 25% पीक विमा मंजूर झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे थेट बँक खात्यांवर वितरण सुरू आहे.

इतके शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार

आतापर्यंत राज्यातील 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, सुमारे 1 हजार 954 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात येत आहे.

Picsart 23 11 18 10 07 10 525

यापैकी आतापर्यंत सुमारे 965 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे.

इतके जिल्ह्याना पीकविमा मिळणार

PM Pik Vima Scheme : राज्यात एकूण 24 जिल्ह्यात अग्रीम देण्याबाबत अधिसूचना काढल्या होत्या. त्यांपैकी 9 जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी विमा देण्याबाबत अंशतः आक्षेप घेतलेले आहेत. या आक्षेपांच्या अपीलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर विमा रक्कम व शेतकरी लाभार्थी संख्येत आणखी मोठी वाढ होणार आहे.

पीकविमा यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *