pikvimayche peise बँक खात्यात जमा होणेस सुरवात
येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिकविम्याची रक्कम असा बातमी आमदार डॉ संजय कुठे यांनी दिली होती ते नंतर शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6 वे दिवशी पासून पिकम्याचे पैसे जमा होणेस सुरवात झाली आहे तर खलील प्रमाणे meg तुमि पाहु शकता

पीकविमा प्रलंबीत प्रश्नाबाबत गेल्या 7/8 महीन्यांपासून जळगाव जामोद मतदारसंघातील पीक विम्याचा प्रश्न घेऊन मी सतत राज्य शासन आणि पीकविमा कंपनी कडे पाठपुरावा करत होतो. बऱ्याच वेळा आंदोलन केली. याचाच भाग म्हणून दिनांक 16 सप्टेंबरमध्ये मी मंत्रालय येथे आंदोलन केले होते त्या वेळी शासनाकडुन 15 दिवसाचा वेळ मागण्यात आला होता आणि याबाबत बैठकीचे आयोजन 15 दिवसात करण्यात येईल अशी विनंती केली होती. त्या नुसार आज कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात पीकविमा कंपनी चे अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी यांचे सोबत या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ही पण बातमी वाचाकोण आहेत पंजाब डख पाटील ?
ही आजच्या बैठकीत सुद्धा पीकविमा कंपनी ने आपली असमर्थता च नकारघंटा कायमच ठेवली होती. पण आज याबाबत निर्णय झाल्याशिवाय पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मंत्रालाय बाहेर जाऊ देणार नाही असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना सांगितले आणि प्रसंगी त्यांना बैठकीच्या ठिकाणाहून खाली फेकून देईल अशी अतिशय आक्रमक भूमिका मी घेतली होती त्याला कृषिमंत्र्यांनी आणि जिल्ह्याचे खासदार प्रताप राव जाधव यांनी समर्थन दिले आणि ते सुद्धा बैठकीत शेवट पर्यंत उपस्थित राहून हीच भूमिका मांडत होते. माझ्या अश्या आक्रमक पवित्र्यामुळे पीकविमा कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती सांगत चर्चा केली आणि उपाय काढण्याचा प्रयत्न केला. माझ्या आक्रमक भूमिकेनंतर आणि त्या चर्चेनंतर पीकविमा कंपनी च्या अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात प्रलंबित असले ला पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल असा शब्द दिला. अश्या प्रकारे आजची मीटिंग वादळी ठरली. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना याबाबत खूप मानसिक त्रास झाला आहे त्यामुळे हा फार मोठा विजय याठिकाणी शेतकऱ्यांचा झालेला आहे. .
pikvimayche peise