Pikvima Yojana Khrip Hangam / प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उत्पन्नावर आधारित नुकसान Pikvima Yojana Khrip Hangam भरपाईची उर्वरित रक्कम द्यावी

खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

जिल्हयात पिक कापणी प्रयोगाचे (Crop Cutting Experiment) संकलन पूर्ण झाले असून नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरीत करण्याची मागणी

जळगाव — प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके (कापूस,उडीद, मूग,सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडा (Gap)मुळे, तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणे बाबत मागणी केली होती. या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी ( ICICI Lombard General Insurance Company Ltd.) (भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही आता ICICI Lombard General Insurance Company Ltd. चा भाग आहे) तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

ही पण बातमी वाचा पुणे मध्ये भरती 2022

अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की सदरच्या मागणी व पाठपुराव्यानुसार नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity) मध्ये पात्र तालुक्यातील एकूण 51421 शेतकऱ्यांनी रक्कम रू.44,25,56,218 (अक्षरी रक्कम रुपये 44 कोटी 25 लाख 56 हजार 218) व वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता 56374 शेतकऱ्यांना रक्कम रु.37,42,92,390/- ( अक्षरी रक्कम रुपये 37 कोटी 42 लाख 92 हजार 390 मात्र) आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.

ही पण बातमी वाचा राहिल्याने शेतकऱ्यांना रु.26500/- नुकसान भरपाई


Pikvima Yojana Khrip Hangam शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच उत्पन्नावर निश्चित झालेले नुकसान भरपाई (Yield Based Losses) ची रक्कम आज तागायत सदरील विमा कंपनीने शेतकऱ्यांना अदा केलेली नसल्याचे माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच सदरील नुकसानीची रक्कम निश्‍चित करण्याकरता आवश्यक असलेले पिक कापणी प्रयोगाचे संकलन (Crop Cutting Experiment) देखील जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाले आहे
मी आपणास या पत्राद्वारे सूचित करू इच्छितो की आपण तात्काळ संबंधित विमा कंपनीस शेतकऱ्याची नुकसान भरपाई ची उर्वरित रक्कम अदा करणेबाबत आदेशित करावे.अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे . निवेदनाची प्रत मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना देखील पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *