शेतकऱ्यांना तारण कर्ज मिळणार ( mortgage loan )

mortgage loan : कमी भावात शेतमाल विकायचा कशाला? तारण योजनेतून  लाखांचे कर्ज वाटप होणार शेतकऱ्यांना आठ टक्के दराने दिली जाते रक्कम:  l संपूर्ण राज्यातील शेतातील शेतमाल एकाच वेळी बाजारात येत असल्याने भाव त्यानंतर काही दिवसांनी आवक कमी झाली किंवा एखाद्या शेतमालाचा तुटवडा निर्माण झाला तर भावात वाढ होते.

शेतकऱ्यांना कर्ज किंवा अन्य लोकांचे पैसे द्यावे लागत असल्याने कमी भावात शेतमालाची विक्री करतात. त्यामुळे शासनाच्या वतीने तारण योजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत कमी शेतमाल तारण भाव असताना बाजार समितीत शेतमाल तारण ठेवल्यावर शेतकऱ्यांना कर्ज योजनेतून ४८ लाख ७७ हजारांचे वाटप देण्यात येते. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यावर शेतकरी विक्री करू
शकतात.

20240215 091712
mortgage loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतमाल तारण योजनेतून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना ४८ लाख ७७ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कमी भाव असताना अनेक शेतकरी शेतमाल विकण्याऐवजी तारण ठेवण्यावर भर देत आहेत.

घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान मिळणार

शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवल्यावर शेतकऱ्यांना
सुरुवातीचे सहा महिने ८ टक्के व्याजदरावर कर्ज दिले
जाते. त्यानंतर यामध्ये वाढ होत जाते. एक वर्षापर्यंत १०
टक्के व वर्षभरानंतर १२ • टक्के व्याज दराने कर्ज
देण्यात येते.

काय आहे तारण योजना?

■ शेतातील शेतमालाची काढणी सर्वत्र एकाच वेळी करण्यात येते. एकाच वेळी
● आवक वाढल्याने शेतमालाचे भाव गडगडतात. त्यानंतर काही दिवसांनी व महिन्यांनी शेतमालाची आवक कमी झाल्यावर भाव वाढतात. पीक निघाल्याबरोबर बाजार समितीत विक्री केली तर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शासनाच्या वतीने तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल तारण ठेवला तर त्यांना
शेतमालाच्या त्या दिवसाच्या एकूण भावाच्या तुलनेत ७० ते ८० टक्के कर्ज देण्यात येते. यामध्ये शेतमाल तारण ठेवून शेतकरी भाव वाढल्यावर विक्री करू शकतात.

ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवर काढा

सर्वाधिक सोयाबीन ठेवले तारण

mortgage loan : जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची करण्यात येते. त्यामुळे शेतकरी सर्वाधिक सोयाबीन तारण ठेवतात. खामगाव बाजार समितीत
तारण ठेवलेल्या धान्यापैकी ८० टक्के सोयाबीन आहे. त्यानंतर तूर तारण ठेवण्यात आली आहे; तसेच अन्य पिकेही तारण ठेवण्यात आली आहेत.कमी भावात शेतमाल विकण्याऐवजी तारण ठेवून भाव वाढल्यानंतर
शेतकरी शेतमालाची विक्री करू शकतात. त्याकरिता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण वेवणाऱ्या शेतकऱ्यांना ४८ लाख ७७ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

  • गजानन आमले,
    शासकीय सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *