महिला समृद्धी कर्ज योजना 5 लाख रुपये कर्ज मिळणार ( Mahila Samriddhi Loan Scheme )

Mahila Samriddhi Loan Scheme : उद्योगासाठी चार टक्के दरानेच व्याज; अर्ज केला का? ‘महिला समृद्धी कर्ज योजना’

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला बचत गटांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महिलांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर केवळ चार टक्के दराने व्याज आकारले जाते. जिल्ह्यातील बचत गटांकडून या योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहे.

20240223 095813
Mahila Samriddhi Loan Scheme

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरी असतात. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी थाटलेले उद्योग अल्पावधीतच भरभराटीस आले आहेत. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्तेही न चुकता अदा केले जातात. त्यामुळेच त्यांच्या उद्योगांना अधिक बळ देण्यासाठी शासनाने आग्रही भूमिका घेतलेली आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


त्याअनुषंगाने महिला समृद्धी कर्ज योजना अंमलात आली असून, त्याचा बचत गटाशी जुळलेल्या महिलांना विशेष लाभ मिळत आहे काय आहे महिला समृद्धी योजना?

अल्पसंख्याक समाजातील महिलांना महिला समृद्धी योजनेंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करून कर्जपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.कर्ज चार टक्के दराने मिळते महिलांना कर्ज अनेक महिलांना मिळाला योजनेचा लाभ
आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक महिलांना महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ज्या महिलांनी अर्ज केले, त्यांनाही कर्ज देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बचत गटाच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे.

https://aamhishetkaree.com/namo-shetkari-yojana-3/

महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत महिलांना . स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

Mahila Samriddhi Loan Scheme : निकष काय ? लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असायला हवा. बचतगट व मागासवर्गीय
घटकातील महिला उद्योजक या योजनेंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत. लाभार्थीचे वय किमान १८ ते ५० वर्षे असायला हवे. अंमलबजावणी सुरू महिला समृद्धी कर्ज योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. बचत गटाशी जुळलेल्या महिलांनी उद्योग सुरू करण्यासाठी योजनेंतर्गत कर्ज मिळविण्याकरिता अर्ज दाखल करावा, असे आवाहन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.