!पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या झालेल्या Khrip pikvima नुकसानी पोटी जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांना २५% अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश या पूर्वीच झाले असुन उर्वरीत १७ महसूल मंडळांना देखील २५% अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे. खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.
यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणी मध्ये ४० महसूल मंडळात ५०% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी या बाबत अधिसूचना काढून जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांना या पूर्वीच २५% अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर सध्याची पिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी उर्वरीत १७ महसूल मंडळाची अधिसूचना आज काढली आहे. यामुळे आता Khrip pikvima जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांना २५% अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. खरीप पिकांची परिस्थिती अतिशय बिकट असुन शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. २ दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उपग्रहाच्या माध्यमातुन नुकसानीची माहिती व वास्तव परिस्थिती विचारात घेऊन विमा कंपनीला आवश्यक ते निर्देश देण्याचे सुचित केले होते. महायुती सरकार सदैव शेतकऱ्यांसोबत असून विमा कंपनीला यात कसलीही कुचराई करु देणार नाही. #पिक #विमा #मंडळ #धाराशिव #Pick #Insurance #Board #Dharashiv