Khrip pikvima / 2023खरीप 2023 पीकविमा

खरीप २०२३ मधील २५% अग्रीम पिक विम्यासाठी Khrip pikvima सोमवारी बैठक..धाराशिव जिल्ह्यात मागील २१ खरीप pikvima दिवसात अधिकांश भागात पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादकतेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. ३ आठवड्याचा खंड व नजर अंदाजाने ५०% पेक्षा जास्त उत्पादनात घट याचा विचार करून प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत योग्य तरतुदीच्या अनुषंगाने पीक विम्याची २५% अग्रीम रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिली आहे.

त्या अनुषंगाने सोमवारी दि.२१ ऑगस्ट २०२३ रोजी दु.०१:३० वाजता जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. खरीप २०२१ व २०२२ मध्ये याप्रमाणे २५% अग्रिम रक्कम मिळवून घेण्यात आपण यशस्वी झालो होतो. त्याच धर्तीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.पावसामुळे ३ आठवड्याहून अधिकचा खंड पडून ५०% पेक्षा अधिकचे नुकसान दिसून येत असेल तर २५% अग्रिमची योजनेत तरतूद आहे. जिल्ह्यातील अनेक भागात हा खंड खरीप pikvima झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून त्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याबाबत विमा कंपनीला आदेश देण्याच्या सूचना केली आहे. पावसातील खंडामुळे पिकांची परिस्थिती बिकट होत असून शेतकरी चिंता दूर होत आहेत.त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी २५% अग्रीमची मागणी करण्यात आली आहे. Khrip pikvimaसोमवारच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन पावसातील खंड व पिकांची परिस्थिती विचारात घेऊन २५% अग्रीम देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी प्रक्रिया सुरू करणे अभिप्रेत आहे. शेतकऱ्यांच्या याबाबत काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरुपात बैठकीत द्याव्यात.#पिक #विमा #शेती #शेतकरी #मदत #धाराशिव #crop #insurance #farming #farmers #help #dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *