2023 चा संपूर्ण हावमान अंदाज / havaman andaj 2023

राज्यात यंदा पाऊस कमीच हवामान खात्याचा havaman andaj 2023 अंदाज,देशात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या(मान्सून) यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमीपावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्रविभागाने आयएमडी) वर्तविली आहे. दशभर सरासरीच्या ९६ टक्के (पाच टक्के अधिक-उणे) पाऊस होईल असा अंदाज मंगळवारी जाहीर केला.

जून ते सप्टेंबर २०२३ या चार महिन्यांसाठी हे अनुमान असून महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पावसाचे भाकीत वर्तविले.’स्कायमेट’ या खासगी संस्थेनेही सोमवारी प्रसिद्धकेलेल्या अंदाजात सरासरीच्या ९४ टक्केपाऊस havaman andaj 2023दोन टक्क्यांचा फरक स्कायमेट’ने व्यक्त केलेल्या अंदाजात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडेल, अशीशक्यता वर्तविली होती. तर आयएमडी’ने ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हा फरक केवळ दोन टक्क्यांचा असला तरी सरकारीभाषेत सरासरीच्या ९६ ते १०४टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य समजला जातो, तर ९५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस अल्पवृष्टी ठरते. त्यामुळे आता कुणाचा अंदाज जास्त बरोबर असेल, यावर यंदाच्या खरीपहंगामाचे भवितव्य ठरेल, असे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *