kapus bajar bhav today कापूस दर 9000 रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापसाच्या दराकडे जिल्ह्यातील तसेच लगतच्या भागातील कापूस उत्पादकांचे लक्ष राहते.याठिकाणी गेल्या काही दिवसात 8700-8800 च्या आसपास भाव कापसाला मिळत होता. परंतु शनिवारीत्यात 300 रुपयांची भर पडली आणि खरेदी 9070 रु. क्विंटलनुसार झाली.त्यामुळे कापूस उत्पादकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
बाजारभाव व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

एपीएमसीमध्ये गेल्या हंगामातदमदार भाव मिळाल्यामुळे यंदाही तीच अपेक्षा कापूस उत्पादकांकडून केली जात आहे. मावळत्या वर्षात कापसाला 12 हजारांवर भाव मिळाला होता. – त्यामुळे पूर्वीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई झाली होती. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. सततच्या पावसामुळे खरीपहंगाम हातून गेला आणि रब्बीच्या kapus bajar bhav today पिकांवर आलेल्या किडीचा प्रादुर्भाव जाणवला. झीजभरून निघण्यासाठी कापसाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे.
सध्या काहीशी वाढ झाली असली तरी त्यात अजून भर पडावी आणि दहा हजारांवरतरी किमान भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.