Garpit Nuksan Bharpai / गारपीट नुकसान भरपाई 2021

शासन निर्णय:-
माहे फेब्रुवारी ते मे ,२०२० या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे वबहुवार्षिक पिकांचे Garpit Nuksan Bharpai झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबतजोडलेल्या विवरणपत्र “अ” नुसार एकूण रू. २४७७६.५२ लक्ष (रूपये दोनशे सत्तेचाळीस कोटी शहात्तर लक्ष बावन्नहजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात यावी:

1) प्रचलित नियमानुसार शेती / बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील.

ii) प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे.

ii) बाधित शेतकऱ्यांच्या Garpit Nuksan Bharpai मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी.

iv) कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत देवू नये.

v) मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने
कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमिका 2/4

vi) मदतीचे वाटप करताना मदतीची ब्दिरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.

३. उपरोक्तप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या
विवरणपत्र “अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण रू २४७७६.५२ लक्ष (रूपये दोनशे सत्तेचाळीस कोटी शहात्तर लक्षबावन्न हजार फक्त) इतका निधी मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ
सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार
खर्च, (९१)(०५) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत,३१ सहाय्यक अनुदाने (२२४५२४५२)
या लेखाशीर्षाखाली पुनर्विनियोजनेव्दारे प्राप्त झालेल्या निधीमधून वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात
येत आहे. कार्यासन म-११ यांनी सदर निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करावा.

इथे क्लीक करून नक्की पहा …फक्त याचं शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा | पासून पैसे जमा | farmer news

वरील लिंक क्लीक करून नक्की पहा

४. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे. तसेच ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च
करण्यात यावा.

शेतकरी योजना 2022 100 टक्के अनुदान / Orchard scheme

लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तातंरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा.

लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील
जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.

https://abmarathi.com/?p=877

५. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *