falpikvima / 70 हजार रु हेक्टरी मिळणार पीकविमा

शेतकऱ्यांना मिळणार
३७५ कोटी नुकसानभरपाई
रक्षा खडसे : जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळे पात्र

मुक्ताईनगर, ता. २२ : हवामान falpikvima फळ पीकविमा उतरविलेल्या
जिल्ह्यातील ५० रक्षा खडसे
हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जास्त
तापमानामुळे तसेच वादळामुळे नुकसान
झाल्याबद्दल प्रतिहेक्टरी जवळजवळ
६१ हजार ५०० ते ७० हजारांपर्यंत
नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी
माहिती खासदार रक्षा खडसे यांनी
दिली.

falpikvima
मे महिन्यामध्ये अति तापमान
तसेच कमी तापमान व जून महिन्यात
वादळामुळे केळीचे खूप मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले होते,
त्याचा विमा कंपनीद्वारे व महसूल
विभागामार्फत पंचनामा केल्यानंतर
जिल्ह्यातील सर्व ८६ महसूल मंडळे
नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात
आलेली आहे. काही मंडळांना कमी व
•जास्त तापमान व वादळामुळे झालेल्या
नुकसानी अंतर्गत प्रति हेक्टर ७० हजार
रुपये तर काही महसूल मंडळांना ६१
हजार ५०० व २६ हजार ५०० अशी
नुकसान भरपाई मिळणार आहे.
गेल्या वर्षी पीकविमा अंतर्गत फक्त
३ महसूल मंडळांना नुकसान भरपाईसाठी
पात्र ठरविण्यात येऊन केवळ ११
हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
मिळाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये
नाराजी होती. परंतु यावर्षी सर्व महसूल
मंडळे नुकसानीसाठी पात्र ठरल्यामुळे
जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई मिळणार असून, शेतकऱ्यांना
थोडाफार हातभार लागणार आहे.
येत्या आठ-दहा दिवसांत सदर नुकसान
भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती
खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *