पीकविमा तारीख फिक्स ( crop insurance date )

crop insurance date : उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०१६ साठी ४९,२२,१८५ रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्यांनी महसुल मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.

पीकविमा यादी इथे क्लीक करून पहा

केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १५६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी श्री . अमरसिंह पंडित साहेब यांनी विधान परिषदेत लावून धरला. सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्यासमवेत मंत्र्यांच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या, मात्र यातून मार्ग निघाला नाही.

20240302 173505
crop insurance date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेवटी त्यांनी सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या वतीने मा. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. याचिकेत दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने आदेश पारीत करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत करण्यात आले. माजी आमदार श्री अमरसिंह पंडित साहेब यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह अपिल क्र.१७९०२/२०१९ मध्ये गेवराईचे भुमिपूत्र ॲड. दिलीप अण्णासाहेब तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू मांडली. मा. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताचे आदेश पारीत करताना मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास नकार देत बँक व विमा कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

https://bit.ly/3Fv70il

मा. सर्वोच्च न्यायालयात सन २०१९ पासून आजवर विविध सुनावणी दरम्यान उमापूर महसुल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी श्री . अमरसिंह पंडित साहेब यांनी केली होती. अखेर मा. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने आदेश पारीत केल्यामुळे आता उमापूर महसुल मंडळातील उमापूर, गायकवाड जळगाव, मालेगाव, बोरगाव, शेकटा, भाटआंतरवाली, बोरीपिंपळगाव सह आदी गावांतील पिक विमा रक्कम भरणा केलेल्या १५६२ शेतकऱ्यांना सुमारे ५ कोटी रुपयांहून अधिक पिक विमा नुकसान भरपाई व्याजासह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

crop insurance date : माजी आमदार श्री अमरसिंह पंडित साहेब यांनी अनेक वर्षांपासून सुरु केलेल्या लढ्याला आता यश आले आहे. उमापूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *