आज मानवत (जि.परभणी) येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘भव्य एल्गार मोर्चा’ तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी हजारो कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले.

या विराट आज मोर्चाला संबोधित केले.गेल्या अनेक दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन व पाठपुरावा सुरुच आहे. परंतु दुर्दैवाने केंद्र सरकारने अद्यापही कापूस उत्पादकांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तातडीने केंद्र सरकारने कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे व सोयापेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा, तसेच या परिसरातील कृषिपंपाची सक्तीची विजबिल वसुली थांबवून कनेक्शन कापणे थांबवावे, जर पुढील १०-१२ दिवसांत केंद्र सरकारने सोयाबीन-कापूस प्रश्नी ठोस निर्णय घेतला नाही, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा पेटून उठतील व राज्यभर आंदोलनाचा आगडोंब उसळेल..! आणि होणारे आक्रमक आंदोलन सरकार हादरवनारे असेल, असा इशारा यावेळी सरकारला दिला.यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,भगवान शिंदे,भास्कर खटिंग, डिगांबर पवार, गजानन तुरे, रामप्रसाद गमे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.या मोर्चाचे उत्कृष्ट आयोजन किशोर ढगे यांच्या नेतृत्वात विठ्ठल चोखट, हनुमान म्हसलकर, दत्ता पऱ्हांडे, अशोक काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले होते.#swabhimanishetkari #shetkari #kisan #अन्नदाता