Pocra list / पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर

नानाजी देशमुख कृषी संजीवनी Pocra list अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे.

याप्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार केली असून, आज मंत्रालयात माझ्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.

“ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेमुळे पोक्रा अंतर्गत प्रत्येक गावाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. यामुळे या प्रकल्पाअंतर्गत योजनांना अधिक चालना व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन मिळेल.”

Pocra list अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती या ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेत देण्यात आली आहे. महा पोक्रा संकेतस्थळावर खास एक विभाग विकसित करण्यात आला आहे. जिल्हा, तालुका व त्यातील गाव निवडून गावाची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. https://mahapocra.gov.in/village-profile या लिंकवर जाऊन कोणीही कोणत्याही गावाची माहिती पाहू शकतात.

पोक्रा अंतर्गत १५ जिल्ह्यांतील प्रत्येक प्रकल्प गावातील पोक्राचे समूह सहायक, कृषीसहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, संबंधित तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी असे प्रकल्प कर्मचारी व अधिकारी, तसेच सरपंच व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी यांची संपर्क सूची देण्यात आली आहे. यामुळे सर्व सामान्य शेतकरी संबंधितांशी थेट संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *