शासन निर्णय

यांना मिळणार 2 एक्कर शेती /Agriculture

Written by aamhishetkaree

कोणती योजना आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप या करीता सन २०२०-२१ या वर्षासाठीची सुधारित तरतूद खर्च करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

किती निधी मंजूर झाला

आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात येत आहे की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप याकरीता सन २०२०-२१या वर्षातील सुधारित तरतुदीपैकी उपरोक्त वाचा येथील शासन ज्ञापन, दिनांक ०८ जानेवारी, २०२१ अन्वये रुपये १२,५०,००,०००/- इतकी तरतूद वितरीत करण्यात आलेली आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू

आता, अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात आलेली सुधारित तरतुदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त) खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे, याबाबतचे विवरण खालीलप्रमाणे आहे:

(रुपये हजारात) अ.क्र. अनुसूचित जाती आणि नवबौध्द
अर्थसंकल्पित सुधारित तरतूद खर्च करण्यासाठी भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप तरतूद रुपये मान्यता देण्यात येत (कर्मवीर दादासाहेब गायकवाड रुपये सबळीकरण व स्वाभिमान योजना) रुपये

१. २२२५, ५०,००,०० २५,००,०० १२,५०,०० |३१,सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (अक्षरी रुपये (अक्षरी रुपये (अक्षरी रुपये बारा
२२२५३६१८ पंचवीस कोटी कोटी पन्नास लक्ष

२. सदर तरतूद खर्च करण्यासाठी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी व संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा महाराष्ट्रत पुन्हा लॉकडाऊन

३. नियंत्रण अधिकारी यांनी उपरोक्त विवरणांतील रकाना ४मधील तरतूद खर्च करावी. सदर तरतूद खर्च झाल्यावर त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करण्यात यावे.

४. प्रस्तुत योजनेवर होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून सन २०२०-२१ या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा:

यांना मिळणारा शेतजमीन

शासन ज्ञापन क्रमांकः अनौसं-२०२०/प्र.क्र.८५/अजाक
मागणी क्रमांक एन-३ मुख्य लेखाशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण ०१, अनुसूचित जातींचे कल्याण (०३) (०५) अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप. (अ.जा.उ.यो.)
(कार्यक्रम) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) २२२५३६१८ उपरोक्त योजनेंतर्गत मागील वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे नियंत्रक अधिकारी यांना तपासण्याच्या अधीन राहून तरतूद खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील.

तसेच, वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर तरतूद खर्च करुन कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांची राहिल.

६. सदर ज्ञापन हे वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. १३९/व्यय-१४, दिनांक २२ मार्च, २०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment