Prdhnmantri krushi sichan | शेतकऱ्यांना मिळणारा या योजनेवर 60 टक्के अनुदान

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना

Prdhnmantri krushi sichan
सूक्ष्म सिंचन योजना सन २०१४-१५
या वर्षात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत
शैतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियान म्हणून राबविण्यात आली. केंद्र शासनाने २०१५-१६ पासून सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन Prdhnmantri krushi sichan योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत कृषी सिंचन योजना या नावाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात ९ जून २०१५ च्या पत्रानुसार या योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसाहाय्याचे प्रमाण प्रत्येकी ५०
टक्के राहणार आहे.

ही पण बातमी वाचा २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर

लाभार्थीसाठी निकष
शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा सात बारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असावी. सिंचनाच्या सुविधेची नोंद सात बारावर असावी.
सात बारावर सिंचनाच्या सुविधेची नोंद नसल्यास विहीर किंवा शेत तळ्याबाबत शेतकऱ्यांकडून स्वयं घोषणापत्र घेण्यात यावे.

http://aamchinaukri.com/pashusavardhan-vibhag-bharti/

बंधारे, कॅनॉल यांसारख्या इतर साधनांद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित असणाऱ्या जलसंधारण व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडून घेण्यात यावे.
सामूहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधित शेतकऱ्यांचे संमतीपत्र घ्यावे.
विद्युत पंपा करिता कायम स्वरूपी विद्युत जोडणी असावी. त्याबाबतचा पुरावा म्हणून प्रस्तावा सोबत शेतकऱ्यांच्या नजीकच्या काळातील विद्युत बिलाची प्रत जोडावी.
सौर पंप बसवून घेतला असल्यास त्याबाबतचे पत्र व सौर पंपा बाबतची कागदपत्रे प्रस्तावा सोबत
जोडावीत.

अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याने राष्ट्रीयीकृत शेड्यूल्ड बँकेत खाते
असल्याचा पुरावा द्यावा. आधार क्रमांक असल्यास सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे.
पात्र शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
यापूर्वी शेतकऱ्याने कोणत्याही योजनेतून सूक्ष्म सिंचन योजनेतून मिळणारा लाभ घेतलेला नसावा. तशा प्रकारचे
लेखी निवेदन शेतकऱ्यांकडून घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुका कृषी कार्यालयातील नोंदींवरूनही याची
खात्री केली जाणार आहे. याबाबतची जबाबदारी कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी
यांच्यावर राहणार आहे
सूक्ष्म सिंचनासाठी फळबागा तसेच कृषी पिकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. तथापि, मंजूर अनुदानाच्या
कमीत कमी २५ टक्के अनुदानाचा वापर पीक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
अनुदान
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थीना खालीलप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे
अवर्षणप्रवण क्षेत्र-
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ६०टक्के – इतर शेतकरी – ४५ टक्के अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील – अल्प व
अत्यल्प भूधारक शेतकरी – ४५ टक्के – इतर शेतकरी – ३५ टक्के .
अधिक संपर्कासाठी – कृषी साहाय्यक – मंडल कृषी अधिकारी – तालुका कृषी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *