व्हाट्सअप साठी आता पैसे मोजावे लागणार ( whatsapp )

लोकमत
whatsapp साठी पैसे मोजावे लागणार ?
ध्या व्हाट्सअपचा  वापर जगभर केला जातो. त्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. हा सर्वांत जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग
प्लॅटफॉर्म आहे.

whatsapp वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याची चर्चा आहे. असे नाही की, व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, परंतु तुम्हाला त्याच्या बॅकअपसाठी पैसे खर्च करावे लागतील. आतापर्यंत whatsapp बॅकअप गुगल ड्राइव्हच्या सामान्य स्टोरेजपेक्षा वेगळे मोजले जात होते. पूर्वी गुगल ड्राइव्हवर मोकळी जागा मिळायची.

20240114 191816
whatsapp

आता या जागेवर १५ जीबीची कॅप लावण्यात आली आहे.
whatsapp बॅकअप आतापर्यंत या कॅपचा भाग नव्हता. कंपनी आपले धोरण बदलत आहे आणि
आता व्हॉट्सॲप बॅकअप हा गुगल ड्राइव्हच्या १५ जीबी फ्री स्पेसचा भाग असेल. १५ जीबी मोकळी
जागा आधीच वापरकर्त्यांसाठी समस्या बनत आहे. त्यांचे फोटो, मेल आणि इतर तपशील त्यावर सेव्ह केले जातात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपचा बॅकअप त्यावर ठेवल्यास जागा आणखी वेगाने भरते.

विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान

whatsapp हे अपडेट बीटा यूजर्ससाठी जारी करीत आहे. अहवालावर विश्वास ठेवला तर कंपनी २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ते आणू शकते. याचा अर्थ असा की,
whatsapp वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत, तर त्याच्या बॅकअपसाठी पैसे खर्च करावे लागतील. तुमची १५ जीबी
जागा भरली असल्यास तुम्हाला अतिरिक्त जागा खरेदी करावी लागेल, जी गुगल ड्राइव्ह प्लॅनच्या स्वरूपात येईल. यासाठी तुम्हाला मासिक पेमेंट करावे लागेल. गुगल वन बेसिक, स्टैंडर्ड आणि प्रीमियम या तीन योजनांमध्ये येतो. या सर्व प्लॅनमध्ये यूजर्सना मासिक शुल्कावर स्टोरेज मिळते. बेसिक प्लॅनमध्ये यूजर्सना १३० रुपयांमध्ये १०० जीबी स्पेस मिळते.

तर स्टैंडर्ड प्लान २१० रुपयांचा आहे, ज्यामध्ये
यूजर्सना २०० जीबी स्पेस मिळते, तर प्रीमियम प्लानची किंमत ६००रुपये मासिक आहे, ज्यामध्ये २ टीबी डेटा उपलब्ध असेल.

शुभेच्छा बॅनर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *