Shetala asa Milava rsta
आपले शेतकऱ्यांना शेतात शेतजमीन कसण्यासाठी स्वतः शेतकरी किंवा मजुरांना शेतात घेऊन जावेलागते, बी, बियाणे, खत, असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलजोडी किंवा ट्रॅक्टर वापरावा लागतो परन्तु काही मुजोर लोक आपल्या शेतीचा बांधावरून जाण्यास अडवणूक करतात. आपला शेतकरीमित्र जर तो रस्ता पूर्वापार वापरत असेल तर कुणालाही अडवणूक करता येत नाही. त्या साठी तहसीलदारा कडे मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 कलम 5 नुसार वादपत्र (अर्ज) दाखल करावे. या मध्ये रस्ता अडविनास प्रतिवादी करावे

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार 5000 हजार रु PM kisan Maandhan Pension Scheme
तुमचा रस्ता अडवला तर हे कार
तुमचा रास्त जर अडवला तर केल्याची घटना तारीख व वेळेसह सविस्तर महिती लिहावी, त्यात (verification ) करावे. योग्य ती तिकीट लावावी. सोबत, दोन्ही साक्षदार असल्यास नाव टाकावे, अर्जा खाली सत्यापन शेताचे सातबारा जोडावे, कच्चा नकाशा तलाठ्यांकडून घेऊन जोडावा. असल्यास साक्षदारांचे नाव द्यावेत हा अर्ज अडवणूक केल्याच्या घटनेपासून पासून 6 महिन्याच्या मुदतीत दाखल करावा लागतो.
Shetala asa Milava rsta
जुना रस्ता असून तो अडवू नये या साठी तहसीलदारांना मामलेदार न्यायालय कायदा 1906 कलम 5 नुसार शेतकऱ्यांना रस्ता पुर्ववत करून देण्याचा अधिकार आहे. तसेच जुना रस्ता जरी नसेल तरी जमीन महसूल कायदा कलम 143 नुसार कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्त्याची मागणी करता येते. ही मागणी तहसीलदार यांना करावी लागेल. वहिवाट कायदा 1982 कलम15 नुसार 20 वर्षं अधिक काळ कोणत्याही रस्त्यावरून मग तो शेतात जाण्याचा असो की घराचारस्ता असल्यास त्या रस्त्यावरुन जाण्यासाठी अधिकार प्राप्त होतो. तो अडविल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. रस्त्यावरून जातांना अडवणूक करणे हा भा द वि कलम 341 नुसार गुन्हा होतो.
ही पण बातमी वाचा पंचायत समिती यादी 2021
शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवू नये या साठी अर्ज तहसीलदार न्यायालयात वरील तरतुदी नुसार करता येतो किंवा दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया कायदा ऑर्डर 39 रूल 1 व 2 नुसार तात्पुरत्या मनाई आदेशा साठी अर्ज व निरंतर मनाईआदेशा साठी दावा दाखल करता येतो. या सर्व कारवाई साठी तालुक्यातील जाणकार वकिलाची मदत घेतल्यास चांगले.