Pradhan Mantri Fasal Bima Yojana List 2022

2020 च्या पीकविमा बाबत सर्वात पहिल्यांदा न्यायालयात दाखल केलेल्या शिवसेनेच्या लढ्याला अंशतः Pradhan Mantri Fasal Bima Yojana List 2022

खरीप हंगाम 2020 मध्ये अतिवृष्टी होऊन जिल्हाभरात पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर विमा कंपनी जुजबी कारणे समोर करून भरपाई देत नसल्याने 10 जून 2021 रोजी मा. उच्च न्यायालयात सर्वात पहिल्यांदा याचिका दाखल करून कायदेशीर लढ्याला सुरुवात केली. दीर्घ संघर्षानंतर येथे आपला पहिला लढा यशस्वी झाला. मा.न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत कंपनीला चपराक दिली. यातून बोध न घेतलेल्या कंपनीने मा. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण नेले. येथे मा. न्यायालयाने 200 कोटी जमा करण्याचे आदेश कंपनीस देऊनच सूनवण्यांना सुरुवात केली. पुढे निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूनेच देऊन सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी दिले. यानंतर विहित मुदतीत सुमारे 531 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयात जमा असलेले 200 कोटी रुपये कंपनीने दिलेल्या पहिल्या यादीतील 1,69,086 शेतकऱ्यांनाच वाटण्याचा घाट घालण्यात आला. उर्वरित 331 कोटी रुपयांची साधी मागणीही कंपनीकडे नोंदविण्यात आली नाही.

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Pradhan Mantri Fasal Bima Yojana List 2022

यामुळेच आपण उपोषणाचे अस्त्र उगारले. आंदोलन सुरू करताच शेतकरी संख्या 1,84,413 ने वाढून ती 3,51,074 वर गेली. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता वितरित होत असलेल्या 201 कोटी रुपयांतील हिस्सा मिळत आहे. आंदोलन सुरू केल्यावरच उर्वरित 331 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कंपनीवर कार्यवाही सुरू झाली. सातव्या दिवशी शासन व प्रशासन बधले. लागलीच जमा असलेले 201 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली. आजपासून ते प्रत्यक्ष खात्यावर वितरित होत आहेत. हे आपल्या 509 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या लढ्याचे अंशत: यश आहे.

जोपर्यंत उर्वरित 331 कोटी तसेच 2021 च्या खरीप हंगामातील 388 कोटी रुपये भरपाई कंपनीकडून व अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून 282 कोटी रुपये प्राप्त होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे.

लढा शेतकऱ्यांसाठी, लढा हक्कासाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *