पीकविमा आला / Pikvima 2023 manjur

Pikvima 2023 manjur / जिल्ह्यातील ४१ मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनला २५ टक्के अग्रीम घोषितजिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आदेश; पिकाला प्रतिहेक्टर ७५०० रुपये मिळणारजिल्ह्यातील ४१ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनला २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याची अधिसुचना जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी  काढली आहे.

पीकविमा यादी

पिकाला हेक्टरी साडेसात हजार रुपये  मिळणार आहे.जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पावसाने दीर्घ विश्रांती घेतली होती. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद आदी पिके सुकून गेली होती. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याची मागणी केली होती.

Picsart 23 11 24 16 04 15 515

शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलन, मागणीची जिल्हाधिकारी गावडे यांनी दखल घेत यापूर्वी ११ मंडळातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारणतः ९ हजार रुपयाप्रमाणे ७३ कोटी रुपयांची २५ टक्के अग्रीम देण्याची सूचना काढलेली आहे. उर्वरित मंडळाचे सर्वेक्षण करून त्यांचाही अग्रीम विमा रकमेसाठी समावेश करण्याची मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी केली होती.

Pikvima 2023 manjur त्यानंतर जिल्हाभरातून उर्वरित मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. परभणी तालुक्यातील झरी, जांब, पेडगाव,टाकळी कु., पिंगळी, परभणी ग्रामीण, पाथरी तालुक्यातील हादगाव बु., कासापूरी, जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. बामणी, दुधगाव, वाघीनोरा, बोरी, आडगाव, चारठाना, पूर्णा तालुक्यातील कातेश्वर, चुडावा, कावलगाव, पालम तालुक्यातील चाटोरी, बनवस, पालम, सेलू तालुक्यातील वालूर, कुपटा, देवूळगाव गात, चिठलठाणा बु., भोगाव, मानवत तालुक्यातील कोल्हा, कासापुरी , गंगाखेड तालुक्यातील महातपुरी माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, शेळगाव, वडगाव अशा सर्व मंडळाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *