Pik Vima Yojana in Maharashtra

Pik Vima Yojana in Maharashtra २०२० पिकविमा संदर्भातील आपल्या लढ्याचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होत असून उर्वरित पीकविमा प्राप्ती संदर्भात ४ विभागात योजनाबद्ध कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी महोदयांना सूचित करण्यात आले आहे. आजवर योजनाबद्ध रीतीने कार्य केल्यामुळे खरीप २०२० पीकविम्याची रू.२०१.३४ कोटींची रक्कम उपलब्ध होऊन, शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार आहे. पुढील रक्कम लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी विभागवार योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

…..
विभाग १ : त्वरित कार्यवाही करून शेतकरी बांधवांना दिलासा देणे :

खरीप २०२० प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातुन, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रु. २०१.३४ कोटी रकमेतून प्रो-राटा (शेतकऱ्यांच्या क्षेत्रनिहाय हिस्यानुसार), गेली दोन वर्षे हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना अदा करणे न्यायचे ठरेल.

याबाबत मा.उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, विधी व न्याय मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांना तशी विनंती केली आहे व त्यांनी ती मान्य केली आहे.

हा निधी दि.२७/१०/२०२२ ला खात्यावर उपलब्ध होताच मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रो-राटा (शेतकऱ्यांच्या क्षेत्रनिहाय हिस्यानुसार) ही रक्कम जमा करण्यात यावी, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

…..

विभाग २ : उर्वरित रक्कम प्राप्तीसाठी प्रयत्न

केंद्र व राज्य सरकारकडे विमा कंपनीच्या दुसऱ्या हप्त्याची अंदाजे रु.२२० कोटी रक्कम प्रलंबित असल्याने हा निधी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने थेट आपल्या नियंत्रणाखालील बँक खात्यात जमा करून घेण्याबाबत, तातडीने केंद्र व राज्य सरकारकडे विनंती करण्यात यावी व हा निधी उपलब्ध होताच तातडीने पुनश्च प्रो-राटा (शेतकऱ्यांच्या क्षेत्रनिहाय हिस्यानुसार) सर्व ३,५७,२८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

विभाग ३ : विमा कंपनी कडून उर्वरित वसुली

उर्वरित देय्य रक्कम रू.११० कोटींची विमा कंपनीला मागणी करण्यात यावी. ती तातडीने उपलब्ध न झाल्यास जिल्हा न्यायदंडाधिकारी या अधिकारात योग्य ती फौजदारी व महसुली कारवाई विमा कंपनी विरूद्ध करावी. त्यानंतर उपलब्ध झालेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

विभाग ४ : मा.सर्वोच्च न्यायालयाला कार्यवाहीबाबत अवगत करणे

मा.सर्वोच्च न्यायालयाला सद्य स्थितीबाबत अवगत करावे तसेच या प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने, योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन घेऊन, मा.सर्वोच्च न्यायालयाला सद्य स्थितीबाबत अवगत करून विमा कंपनीविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

…..

Pik Vima Yojana in Maharashtra

खरीप २०२० हंगामात धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते व या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश बजाज अलीयांझ जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले होते.

मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील हे आदेश कायम ठेवले व पिक विमा कंपनीकडून जमा झालेल्या रु. २०० कोटी व त्यावरील व्याजासह रु.२०१.३४ कोटीचा धनाकर्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव (उस्मानाबाद) यांच्याकडे दिनांक २०/१०/२०२२ रोजी सुपूर्द केला आहे. सदरील धनाकर्ष दि. २१/१०/२०२२ रोजी बँकेत जमा करण्यात आला असून साधारणतः २७/१०/२०२२ रोजी प्रत्यक्षात खात्यावर पैसे उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

विमा कंपनीने ४०% नुकसान गृहीत धरून रू. १८,०००/- प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याचे आपल्या मागणी प्रमाणे मान्य केले आहे. याप्रमाणे संपूर्ण देय्य रक्कम रू. ५३१ कोटी आहे. परंतु, कंपनीने २,०३,६६६ शेतकऱ्यांची यादी दिल्यानंतर पुढील १,५३,६२१ शेतकऱ्यांची यादी देण्यास चालढकल सुरू केल

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाआणि खरीप २०२१ बाबत महत्त्वाचे :

खरीप २०२१ प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातुन धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रु. ४०० कोटी नुकसान भरपाई अदा झाली परंतु तेवढीच रक्कम बाकी असल्याने आपण विमा कंपनीला दिलेल्या आदेशाचे पालन दि. २७/१०/२०२२ पर्यंत न झाल्यास जिल्हा न्यायदंडाधिकारी या अधिकारात योग्य ती फौजदारी व महसुली कारवाई विमा कंपनी विरूद्ध करणे आवश्यक ठरते.

ड्रायव्हिंग लायनस मोबाईल काढा

या विषयाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून तातडीने कार्यवाही व्हावी, याबाबत आपण आग्रही आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *