नुकसान भरपाई शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणे सुरु ( PIK Nuksan Bharpai )

PIK Nuksan Bharpai : अवकाळी, गारपीटमुळे नुकसान; शेतकऱ्यांना २२० कोटींची मदत! जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित

बुलढाणा : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे ३३
टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांचा याचा फटका बसला होता.

20240220 132901
PIK Nuksan Bharpai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


दरम्यान, या नुकसानीपोटी आताशेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जानेवारी २०२४ मध्येच यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले
आहे.

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

यासंदर्भाने आता ३१ जानेवारी २०२४ रोजी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या नुकसानापोटीचे १ लाख ५७ हजार १८०
हेक्टर बाधित क्षेत्रातील २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपये मदत म्हणून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. लवकरच
नुकसानग्रस्त गावांमध्ये यांचा समावेश चिखलीमधील चिखली, हातनी, उद्रौ, धोडप, अमडापूर, पेठ, एकलरा, कोलारा, नोव्हेंबर २०२३ मध्ये बुलढाणा तालुक्यातील पाडळी, धाड, म्हासला बुद्रुक मेरा, शेलगाव आटोळ, आंधई, चांधाई, मोताळातील पिंपरी गवळी, शेलापूर,
मोताळा, बोराखेडी, रोहीणखेड मलकापुरातील दाताळा, धरणगाव, खामगावातील पारखेड, हिवरखेड, लाखनवाडा, काळेगाव, जनुना वझर, आवार, संग्रामपुरातील पातुर्डा, मेहकरमधील अंजनी, शेलगाव देशमुख, डोणगाव, कल्याण, हिवरा आश्रम, लोणी गवळी, मेहकर, जानेफळ, वरखंड, नायगाव
दत्तापूर, देऊळगाव माळी, लोणारातील हिरडव, टिटवी, सुलतानपूर, लोणार, बीबी, अंजनी खुर्द, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, तुळजापूर,
मेव्हणा राजा, देऊळगाव मही, अंढेरा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा, सोनोशी, दुसरबीड, मलकापूर पांगरा, साखरखेर्डा, शेंदुर्जन सिंदखेड राजा या
भागातील १ लाख ५७ हजार १८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचा अहवाल त्वरेने शासनास पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

http://bit.ly/3FnxNgs


प्रशासकीय पातळीवर त्यासंदर्भाने कार्यवाही करण्यात आली होती.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
होणार असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना दिलेली

PIK Nuksan Bharpai : मदत ही बँकांनी वसुली खात्यात वळती करू नये, यासंदर्भाने जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या
असल्याचे खा. जाधव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *