Nvin vihir / नवीन विहीर साठी 250000 लाख रु

१. इच्छुक लाभार्थी शेतक-यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in
संकेतस्थळावर नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करावी.

२. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने अपलोड केलेल्या कागदपत्रांची छानणी करुन ऑनलाईन अर्जाची
अत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनु.जाती/अनु. जमाती/दिव्यांग/महिला शेतकरी/ इतर सर्वसाधारण
शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी करावी.

३. सर्व ऑनलाईन प्राप्त अर्ज ग्राम कृषि संजीवनी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करणे व मंजुरी प्राप्त झालेनंतर तसा ठराव संकेतस्थळावर अपलोड करणे.

४. शेतकऱ्यांस योजनेच्या अटी व शर्ती तसेच घटकाबाबतचे आर्थिक व तांत्रिक निकष समजावून सांगावे.

५. पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती बाबत अवगत करणे.
कृषि सहाय्यक

१. अपलोड केलेल्या कागदपत्रांची छानणी करताना शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज, शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा
७/१२ उतारा, ८-अ, यापूर्वी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे काय? या बाबतचा तपशिल, प्राधिकृत अधिकाऱ्याचे
संवर्ग प्रमाणपत्र (अ.जाती, अ.जमाती शेतकऱ्यांसाठी) आहे काय?, इत्यादी सर्व अनुषंगीक बाबींची पडताळणी
करावी.।

२. Nvin vihir या घटकासाठी प्राप्त अर्जाची गावनिहाय वर्गवारी करून विहिरींची घनता निश्चित करण्यासाठी त्या
गावाचे लागवडीयोग्य क्षेत्राचे क्षेत्रफळ आधारभूत धरावे व खालीलप्रमाणे गावनिहाय माहिती संकलित करून
संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांना सादर करावी-
१. गावाचे लागवडीखालील क्षेत्र,हे. –
२. अस्तित्वातील विहिरींची संख्या –
३. प्रस्तावित विहिरींची संख्या (मागणीनुसार)-

३. पात्र अर्जाच्या नियोजित प्रकल्प स्थळाची तसेच ८-अ मध्ये नमूद सर्व गट/सर्वे नं. मध्ये पाहणी तपासणी सूचीनुसार
करुन नियोजित प्रकल्प स्थळ व लाभार्थी सदर घटकासाठी पात्र आहे किंवा नाही याबाबत ऑनलाईन अहवाल
उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा. तसेच नियोजित प्रकल्प स्थळाचे भौगोलिक स्थानांकन (Geo
tagging) DBT app द्वारे करावे.

४. विहिरीचा घनता (संख्या) निश्चित झालेला अहवाल संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडून प्राप्त झाल्यावरसदर संख्या ग्राम कृषि संजीवनी समितीच्या निदर्शनास आणून स्थळ निश्चिती करण्यासाठी अंतिम लाभार्थी यादीतयार करून संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांना ऑनलाईन सादर करावी.।

५. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास इतर योजनेतून शासकीय अनूदान घेतले असल्या/नसल्याबाबत संबंधित
अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करून ही बाब प्रकल्प मंजूरीसाठी सादर करताना उपविभागीय कृषि अधिकारी यांनाअवगत करावी.

नवीन 5 योजने सुरू

६. च्या कामासाठी कामाची आखणी (Layout) व अंदाजपत्रक तयार करून त्यास संबधित उपविभागीयकृषि अधिकारी यांची तांत्रिक मान्यता घ्यावी.

७. विहिरीच्या कामाची मापनपुस्तिकेत नोंदणी करणे व संकेत स्थळावर अपलोड करणे.

८. Nvin vihir आखणी करताना,खोदकाम पूर्ण झालेनंतर विहीर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देताना DBT app द्वारे
नैऋत्य कोपरा स्थळाचे अक्षांश/रेखांशसह भौगोलिक स्थानांकन करून ते प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अपलोड
करावे.

हे पण बातमी वाचा Pm किसान योजनेतुन या शेतकऱ्यांना हटवला / यादी मध्ये नाव पहा

वरील लिंक क्लीक करून वाचा

९. लाभार्थी शेतकऱ्यांने विहिरीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाल्याचे ऑनलाईन कळविल्यानंतर संबंधित कृषि
सहाय्यक यांनी मार्गदर्शक सूचनेत दिल्याप्रमाणे विहीरीचे काम तांत्रिकदृत्या योग्य असल्याबाबत मोका तपासणी
करावी. ऑनलाईन मोका तपासणी अहवाल नोंद करून ऑनलाईन पद्धतीने उपविभागीय कृषि अधिकारी यांना
सादर करावा.

१०.अनुदान मागणीसाठी देयके व आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून संकेतस्थळावर अपलोड करणे.
कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्यक यांनी अवगत केल्यानंतर कृषि पर्यवेक्षक यांनी राबविलेल्या घटकाची १०% अनुदान अदायगी पूर्वीतपासणी करावी.

त्याबाबतच्या मापनपुस्तिकेतील नोंदी प्रमाणित कराव्यात व सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात
पर्यवेक्षकीय तपासणी अहवाल तयार करावा. तपासणी अहवालावर लाभार्थीची स्वाक्षरी घ्यावी व त्याखाली लाभार्थीचेनाव नमूद करावे. तपासणी अहवाल संकेतस्थळावर कृषि सहाय्यकामार्फत ऑनलाईन उपविभागीय कृषि अधिकारी
यांना सादर करावा.

उपविभाग स्तर (लेखाधिकारी)
अनुदान प्रस्ताव व तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर लेखाधिकारी उपविभाग स्तर यांनी अनुदान प्रस्ताव तपासून
पडताळणी करून पात्र प्रस्तावांना उप विभागीय कृषि अधिकारी यांचेकडे अनुदान अदायगीसाठी शिफारस करावी.
उपविभागीय कृषि अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *