Krushi yantrikikrn yojana / कृषी यांत्रिकीकरण साठी निधी मंजूर

Krushi yantrikikrn yojana 2020

प्रस्तावना:- संदर्भाधीन दि.१२ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक-३, वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे/यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्र-४, कृषि औजारे/यंत्रे बँकाना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी करावयाची आहे. सदर घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप
अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करावयाची आहे.
या योजनेसाठी सन २०२०-२१ या वर्षात रु.७६०० लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

कृषि यांत्रिकीकरण निधी वाटप 2021

वित्त विभागाने संदर्भाधीन दि.१० नोव्हेंबर, २०२० च्या परिपत्रकान्वये, ज्या विभागांमार्फत मत्ता निर्मिती व पर्यायाने रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबींसाठी सन २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्पीत निधी ७५ टक्के वितरणास मान्यता दिलेली आहे.

Krushi yantrikikrn yojana

PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना यंत्र व औजारासाठी तसेच कृषि औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. त्याचप्रमाणे, कृषि औजारे बैंक स्थापनेमुळे मत्ता निर्माण होवून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या तरतूदीच्या ७५ टक्के म्हणजेच रु.५७ कोटी निधी वितरीत करण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

यांत्रिकीरकण  वित्त विभागाने मंजूर तरतूदीच्या २५ टक्के निधी वितरणास मान्यता दिलेली आहे.

वित्त विभागाने राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीरकण योजनेचा २५टक्के निधी वितरीत करण्यास
दिलेली अनुमती विचारात घेऊन, सदर योजनेसाठी मंजुर तरतूद रु.७६०० लक्षच्या २५ टक्केच्या मर्यादेत रु.१९०० लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन सदर निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-
१) सन २०२०-२१ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, रू.१९०० लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२) या शासन निर्णयान्वये, सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता रु.१९००लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) वितरीत करण्यात येत आहे.

३) सदर योजनेंतर्गत मंजूर केलेला रु.१९०० लक्ष निधी (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त खालील लेखाशीर्षाखाली चालू वर्षी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून खर्ची टाकावा.

बँक खात्यात जमा होणार निधी

४) या योजनेंतर्गत वितरीत करण्यात आलेला निधी केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुज्ञेय बाबींवर खर्ची टाकावा तसेच, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे जमा करावी.

५) अनुदानाची रक्कमेचे वितरण महा-डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात यावे.

६) सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५०% किंवा रु.१.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यासाठी किंमतीच्या ४०% किंवा रु.१ लाख यापैंकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात यावे.

सिम कार्ड नावावर किती आहेत

७) इतर बाबतीत योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील अटी व शर्तीचेकाटेकोरपणे पालन करण्यात यावे.

८) सदर निधी खर्च करताना तो विहीत कार्यपद्धती अनुसरुन वित्तीय कायदे/प्रकियाचे/वित्तीय
अधिकारांच्या मर्यादेत/C.v.C.तत्वानुसार/प्रचलित शासन निर्णय/ नियम/ परिपत्रक/ तरतदीनुसार बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणांनी करावी.

कोणत्याही परिस्थितीत कुठलाही नियम/अधिकाराचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची राहील.

९) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी
संचालक (नि. व गु.नि.), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *