15 दिवसात बँक खात्यात पीकविमा जमा होणार ( In crop insurance bank account )

In crop insurance bank account : ६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना १५ दिवसात रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील!

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करून पहा

खरीप २०२२ मधील नुकसान भरपाईची एकूण अनुज्ञेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रक्कमेच्या  पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करुन घेणे बाकी आहे. विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केलेल आहे

20240202 092439
In crop insurance bank account

त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील १५ दिवसात शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा होणार वितरित करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या रुपये २१० कोटी रक्कमेच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे नुकसान भरपाई ची रक्कम जमा झालेल्या विमा हप्त्याच्या ११० टक्के पेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम  शासन स्वीकारेल आणी जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम  शासनाला परत करेल अशी तरतूद करण्यात आली  आहे.

शुभेच्छा बॅनर बनवा

खरीप २०२२ मधील एकूण नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्याने  राज्य शासनाकडून अपेक्षित रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करण्यासाठी रोज पाठपुरावा सुरू आहे, जेणे करून ही रक्कम शेतकऱ्यांनाचा  बँक खात्यात लवकरात लवकर मिळेल.

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांतील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप २०२२ मधील नुकसानीच्या केवळ ५०% भरपाई वितरित करण्यात आली  आहे. राज्य शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देताच विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

In crop insurance bank account : राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्तालयमार्फत जमा करून काल शासनाकडे पाठविण्यात आली आहे. पुढील दोन दिवस आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *